आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'3 इडियट्स'चा चतुर बनला पप्पा, शेअर केला मुलासोबतचा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या चिमुकल्या मुलासोबत अभिनेता ओमी वैद्य)
मुंबईः आमिर खानच्या सुपरहिट '3 इडियट्स' या सिनेमात चतुर रामालिंगम ही विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता ओमी वैद्य तुमच्या लक्षात असेलच. आपल्या कॉमिक टायमिंग आणि अल्टीमेट स्पीचने प्रेक्षकांना लोटपोट करुन सोडणारा ओमी वैद्य ख-या आयुष्यात पप्पा झाला आहे. मंगळवारी ओमीने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये तो आपल्या क्यूट बेबी बॉयसोबत पोज देताना दिसतोय.
ओमीचे 2009 मध्ये मीनल पाटीलसोबत लग्न झाले. या दाम्पत्याचे हे पहिलेच बाळ आहे. 2005 मध्ये अटेस्टेड डेव्हलपमेंट या अमेरिकन टीव्ही सीरिजद्वारे आपले करिअर सुरु करणारा ओमी बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही कार्यरत आहे.