आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It\'s Confirmed! Bipasha Basu And Karan Singh Grover To Tie The Knot This Month

बिपाशा बसू - करणच्या लग्‍नाची तारीख निश्चित, प्रियंकाने दिला ट्व‍िटवर दुजोरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हे वर्ष बॉलिवुडकरांसाठी लग्‍नाचे आहे. पहिल्‍यांदा प्रीती झिंटा नंतर 'रंगीला गर्ल' उर्मिला मांतोडकर विवाह बंधनात अडकली. आता बिपाशा बसूसुद्धा प्रियकर करण सिंह ग्रोवरसोबत येत्‍या 30 एप्रिलला मुंबईतील एका हॉटेलमध्‍ये लग्‍न करणार असल्‍याचे वृत्‍त एका इंग्रजी वेबसाइटने दिले.
प्रियंका चोप्राने दिला दुजोरा
> प्रियकांने म्‍हटले 'माझी मैत्रीण बिपाशा आणि तिचा भावी पती करण यांना मी मनापासून शुभेच्‍छा देते.'
करणचे असणार तिसरे लग्‍न
यापूर्वी करणचे दोन वेळा लग्‍न झाले असून, दोन्‍ही पत्‍नीसोबत त्‍याने काडीमोड घेतला. त्‍याचे पहिले लग्‍न टीव्‍ही अॅक्ट्रेस श्रद्धा निगम सोबत झाले होते. काही दिवस संसार केल्‍यानंतर या दाम्‍पत्‍यात घटस्‍फोट झाला. त्‍यानंतर टीवी कलाकार जेनिफर विंगेटसोबतच त्‍याने दुसरे केले. पण, तेही लग्‍न जास्‍त दिवस टिकले नाही.
गुपचूप उरकला साखरपुडा...
> 5 मार्च रोजी बिपाशा आणि करण मुंबईच्या एका स्पामध्ये मसाज करण्यासाठी गेले होते.
> येथून बाहेर पडताना त्यांचे काही फोटो क्लिक झाले. त्यानंतर बिपाशा-करणच्या साखरपुड्याची बातमी वा-यासारखी पसरली.
> त्‍यावेळी बिपाशाचा एका फोटो समोर आला होता. त्यामध्ये तिच्या बोटात अंगठी दिसत होती.
फेब्रुवारीमध्ये होती चर्चा...
फेब्रुवारीमध्ये बातमी आली होती, की बिपाशा मार्चमध्ये करणसोबत साखरपुडा करणार आहे.
> रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते, की स्वत: करण आणि बिपाशाच्या एका जवळच्या फ्रेंडने हा प्लान रिव्हील केला होता.
> पण आता त्‍यांच्‍या लग्‍नाची तारीखही निश्चित झाली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कधीपासून आहे दोघांचे प्रेमकरण...