आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Its Official: Priyanka Chopra Confirms Bipasha Karan's Wedding

It's Official: प्रियांकाने दिले बिपाशा-करणच्या लग्नाचे Confirmation

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अनेक दिवसांपासून बिपाशा बसु आणि तिचा बॉयफ्रेंड करण सिंह ग्रोवर बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, दोघांनी याविषयी काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. अखेर अभिनेत्री प्रियांका चोप्राने दोघांच्या लग्नाचे कन्फर्मेशन टि्वटरवरून दिले आहे. बिपाशासोबत 'बरसात' सिनेमात एकत्र काम केलेल्या प्रियांकाने लिहिले, 'I'm truly so happy for my friend @bipsluvurself n her handsome bridegroom to be @Iamksgofficial Ure a golden heart..u deserve so much n more'
बिपाशा बनणार करणची तिसरी पत्नी...
- लग्न करून बिपाशा करणची तिसरी पत्नी होणार आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही जोडी 29 एप्रिलला लग्नगाठीत अडकणार आहे.
- करण सिंह ग्रोवरने यापूर्वी दोन लग्न केली असून त्याचा घटस्फोट झाला आहे.
- त्याचे पहिले लग्न टीव्ही अभिनेत्री श्रध्दा निगमसोबत तर दुसरे लग्न टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत झाले होते.
या स्टार्ससोबत जुळले बिपाशाचे नाव...
- 2002मध्ये आलेल्या 'राज'मध्ये एकत्र काम केलेल्या डिनो मोरिया आणि बिपाशाच्या
अफेअरच्यासुध्दा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
- डिनोपासून विभक्त झाल्यानंतर बिपाशाचे नाव जॉन अब्राहमसोबत जुळले.
- जॉन-बिपाशा 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले होते. ही जोडी अनेक वर्षे लिव्ह-इनमध्येसुध्दा राहिली होती.
- जॉनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशाचे नाव राणा दुग्गुबती आणि हरमन बावेजासोबत जुळले होते.
कशी वाढली बिपाशा-करणची जवळीक?
- 'अलोन' सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली.
- सिनेमा रिलीज झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक पार्टी, हॉलिडेवर हे कपल एकत्र दिसते.
- दोघांचे सोशल अकाऊंट्स एकमेकांच्या फोटोंनी ओसांडून वाहत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवरचे रोमँटिक क्षण...