आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलीनला मिळाली 'जुडवा'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची 1997 साली सलमान खानच्या जुडवा चित्रपटाच्या सीक्वलमध्ये वर्णी लागली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत जॅकलीन झळकणार आहे. 
जॅकलीनला विश्वास आहे की जुडवाचा सिक्वलची सलमानच्या जुडवाइतकीच जादू प्रेक्षकांवर चालेल. 
 
Raw Raspberry बिवरेजच्या लाँचिंगवेळी जॅकलीनला चित्रपटांबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले, "20 वर्षानंतर निर्माते चित्रपट घेऊन येत आहेत त्यामुळे मी फारच उत्साहीत आहे. जॅकलीनने सांगितले की अनु मलिक यांचा पहिला सुपरहिट चित्रपटातील गाणी 'उंची है बिल्डींग' आणि 'टन टना टन' रिक्रिएट होणार आहेत. हे गाणेही तेवढीच धमाल उडवतील असा विश्वास आहे."
 
'जुडवा 2' हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे जो डेविड धवन दिग्दर्शित करणार आहेत. यात वरुण धवन डबलरोल करत आहे तर जॅकलीन आणि तापसी पन्नूच्या मुख्य भूमिका 
आहेत. 
बातम्या आणखी आहेत...