आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: जान्हवी कपूरच्या डेब्यू फिल्मची शूटिंग सुरु, आई श्रीदेवीसोबत पोहोचली सेटवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धडकच्या मुहूर्ताचा शॉटमध्ये जान्हवी - इशान. इन्सेट श्रीदेवीसोबत जान्हवी. - Divya Marathi
धडकच्या मुहूर्ताचा शॉटमध्ये जान्हवी - इशान. इन्सेट श्रीदेवीसोबत जान्हवी.

उदयपूर - 'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'ची शूटिंग शुक्रवारी राजस्थानमध्ये सुरु झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्ट्रेस श्रीदेवीची मुलगी जान्हवी 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. मुलीच्या पहिल्या फिल्मसाठी श्रीदेवीही उत्साहित आहे, ती स्वतः जान्हवीला घेऊन उदयपूरमधील बर्डव्हिलेज मेनार येथे पोहोचली होती. प्रोड्यूसर करण जोहर टीमसह मेनार येथे पोहोचला. या फिल्ममध्ये शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहे.  गावातील ब्रहम सागर किनाऱ्यावर असलेल्या 52 फूट उंच शिव प्रतिमेच्या पूजेने शूटिंगला सुरुवात झाली. शूटिंगच्यावेळी श्रीदेवीही जान्हवीसोबतच होती. 

 

'धडक'च्या टीमने केली मंदिरात पूजा.. 
- बॉलिवूड सेलिब्रिटी गावात शूटिंगसाठी येत असल्याने उदयपूर पोलिस आणि खेरोदा पोलिस स्टेशनचे जवान शूटिंगस्थळी हजर होते. याशिवाय 75 खासगी सुरक्षा रक्षककी तैनात करण्यात आले होते. 
- मेनार ग्रामस्थांनी धडकच्या टीमचे मनापासून स्वागत केले. जान्हवी कपूर आणि टीमला स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गावात सत्कार करण्यात आला. 

 

6 जुलैला रिलीज होणार धडक 
- धर्मा प्रोडक्शनच्या इंस्टाग्राम पेजवर फिल्मच्या मुहूर्ताचे फोटोज शेअर करण्यात आले आहेत. 
- धडकचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. ही फिल्म 6 जुलै 2018 ला रिलीज होणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा On Location Photos... 

बातम्या आणखी आहेत...