आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील: श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवीचे पदार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवीसोबत श्रीदेवी. - Divya Marathi
जान्हवीसोबत श्रीदेवी.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी मराठी चित्रपट सैराटच्या हिंदी आवृत्तीतून पदार्पण करणार आहे. करण जोहर इंडस्ट्रीत स्वयंभू गॉडफादर आहेत. सैराटमध्ये दाखवण्यात आलेली ऑनर किलिंगसारखी घटना महाराष्ट्र -कर्नाटक सिमेवरील भागापुरतीच मर्यादित आहे. पण हरियाणाच्या अनेक भागांतही तशा घटना घडत असतात. प्रेमी युगलांची हत्या त्यांच्या कुटुुंबातील लोकच करत असतात. जातीयवादाचे विष पाहा, कसे आपल्याच रक्ताला नाल्यात फेकले जाते. आपण इतके हिंसक झालो आहेत की ममतादेखील सोडून िदली आहे. 
‘सैराट’चे प्रेमी युगल आपल्या मेहनतीने आणि प्रेमाने छोटासा संसार थाटतात. नातेवाईक भेटायला येतात म्हणून ते त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागतात. प्रेम जिंकले आणि जातीयवाद हरला. असा विचार करत ते त्यांची सेवा करतात. मात्र, बेसावध असतानाच त्यांची हत्या करण्यात येते. त्यांचा लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यातून चालत येतो. त्याला माहीत नसते की, त्याचे आई-वडिल जातीयवादाचे बळी ठरले अाहेत. असो, ३५ चित्रपटांची निर्मिती करणारे बोनी कपूर आपल्या मुलीसाठी एखादा चित्रपट का बनवू शकले नाहीत, याचे नवल वाटते. करण जोहरपेक्षा त्यांचा अनुभव दांडगा आहे. करण जोहरने यशस्वी चित्रपट बनवले आहेत, मात्र एखाद्या महान चित्रपटाची निर्मिती केली नाही. आज चित्रपट उद्योगात गुंतवणूकदारांचीही काही अडचण राहिलेली नाही. ज्या काळात आर्थिक संकट हाेते, अशा काळातदेखील बोनी कपूर यांनी गुंतवणूकदार शोधले होते आणि धाकट्या भावाला अनिल कपूरला सादर केले होते. नंतर संजय कपूरलादेखील पडद्यावर आणले. त्या काळी चित्रपट निर्मितीसाठी कॉर्पोरेट जगताकडून पैसा मिळत नव्हता. त्यामुळे व्याजावर पैसा काढून चित्रपट बनवले जायचे आणि नफ्याचे लोणी गुंतवणूकदार खाऊन टाकायचा. निर्मात्याला ताकावरच समाधान मानावे लागायचे. आता कालचक्र फिरले अाहे, बहुतांश नफा स्टार घेऊन जातो आणि निर्मात्याच्या हाती पुन्हा ताकच लागते आहे. संपूर्ण चित्रपट उद्योगच ताक पिऊन दंडबैठक मारत आहे. सध्या लोणी जीएसटी खात्यात जात आहे. दुसरीकडे एकल चित्रपटगृहे बंद होत आहेत. श्रमिकांचे नेहमीच शोषण होत असते. अशा प्रकारे भांडवलशाही प्रत्येक अंगणात पसरत चालली आहे. 


किशोरवयीन प्रेमकथांचा काळ बॉबीपासून सुरू झाला होता. ऋषी कपूर, सिम्मी ग्रेवाल आणि मनोज कुमार अभिनीत भागावर एक स्वतंत्र चित्रपट बनवण्याचा सल्ला अर्धा चित्रपट पाहून सत्यजित रे यांनी दिला होता. ‘जोकर’च्या धर्मयुगमध्ये प्रकाशित समीक्षेत कमलेश्वर यांनी लिहिले होते की, ‘जोकर’च्या पहिल्या भागात राज कपूर सगळ्याच दिग्दर्शकांना मागे सोडून पुढे निघून गेल्याचे वाटतात. दुसऱ्या भागात ते थकलेले वाटतात, तर तिसऱ्या भागात ते स्वत:पासूनच दूर पळताना दिसतात. असो, जान्हवीला एखाद्या सुखान्त प्रेम-कथेतदेखील सादर करता आले असते. मात्र, कोणता विचार करून बोनी कपूर यांनी ‘सैराट’ला होकार दिला, देव जाणे. एक दुसरा पर्याय म्हणून जान्हवीला दक्षिण भारतातदेखील आपले करियर सुरू करता आले असते, कारण ती श्रीदेवी यांची मुलगी आहे. तेथील प्रेक्षकांनी तिला डाेक्यावर घेतले असते. ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘मॉम’च्या यशानंतर माय-लेकीच्या नात्यावर चित्रपट बनवला असता तर श्रीदेवीने तो अापल्या बळकट खांद्यांवर पेलून नेला असता. सगळ्या गोष्टींचा विचार केला असता तर सैराटपेक्षा चांगले पर्याय त्यांच्याकडे होते. चित्रपट उद्योग नावाच्या मशिनीत चक्राच्या आत चक्रे असतात आणि सगळा वेग एकमेकांवर आधारित असतो. हे जग आणि त्यातील जीवनदेखील चक्राप्रमाणे फिरत असते. चित्रपट माध्यमाचे पहिले कवी चार्ली चॅप्लिन यांच्या १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मॉडर्न टाइम्स चित्रपटात एक दृ़श्य होते. त्यात एका कारखान्यातील एक मजूर भव्य चक्राची सफाई करत असतो, तेव्हा कोणी तरी बटण सुरू करते, तो माणूसही त्या चक्रासोबत फिरू लागतो, त्या वेळी तो त्या मशीनचाच एक भाग वाटू लागतो. माणसाच्या मशिनीकरणाची प्रक्रिया दीर्घकाळापासून सुरू आहे. मी लिहिलेला ‘सेल्समैन की आत्म-कथा’ यावरच आधारित होता. 

बातम्या आणखी आहेत...