आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद हबीबना हार्ट अटॅक, पोस्टरमध्ये उडवली होती देवतांची खिल्ली, सोशल मीडियावर झाले Troll

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने पोस्टरमध्ये हिंदु जेवी देवतांची खिल्ली उडवल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यूजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत की, हबीबने जर मोहम्मद पैगंबरांची खिल्ली उडवली असती, तर आतापर्यंत त्याच्या विरोधात फतवा निघाला असता. त्याने एका सलूनच्या एका जाहिरातीत देवी देवतांची चित्रे वापरली होती. सलूनमध्ये बसून सर्व देवता मेकअप करत असल्याचे दाखवले होते. जावेद हबीबने याप्रकरणी माफीही मागितली आहे. दरम्यान, काल एका कार्यक्रमात जावेद हबीब यांना हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे. 
 
जावेद हबीब यांना हार्ट अटॅक 
दरम्यान, एकिकडे देवी देवतांच्या अपमानाची बातमी पसरल्यानंतर जावेद हबीब यांनी लगेचच माफी मागितली. हरियाणात त्यांच्या एका हेअर सलूनच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची तब्येत अचानक बिघडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर हबीब यांना कशाप्रकारे Troll करण्यात आले...  
 
बातम्या आणखी आहेत...