आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला 'भारत की बेटी' मानते ही अॅक्ट्रेस, अखिलेश यादवला म्हटले अॅरोगंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयाप्रदा आणि अखिलेश यादव. - Divya Marathi
जयाप्रदा आणि अखिलेश यादव.

मुंबई - जयाप्रदा मल्याळम फिल्म 'किन्नरु'द्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ऑफ बिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध एम.ए. निशाद 'किन्नरु'चे दिग्दर्शक आहे. काही वर्षांपासून जयाप्रदा यांनी चित्रपटात काम करणे बंद केले होते. त्या समाजवादी पक्षाच्या सक्रिय सदस्य आणि खासदार होत्या. 1994 मध्ये तेलगु देसम पार्टीतून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. चित्रपट कारकिर्दीप्रमाणेच त्यांचा राजकारणाचा प्रवासही दक्षिणेकडून उत्तरेकडे झाला होता. नंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षात प्रवेश केला. अखिलेश यादव यांच्या हातात पक्षाची सूत्रे आल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी जयाप्रदांना उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेवरुन दूर केले. 

 

फिल्मवर फोकस करणार जयाप्रदा 
- जयाप्रदा नुकत्यात हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित तिसऱ्या इंडीवूड फिल्म कॉर्निव्हलला पोहोचल्या होत्या. या सोहळ्यात जयाप्रदा यांना ऑय कॉन ऑफ द इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 
- यावेळी जयाप्रदा यांनी DivyaMarathi.com सोबत खास बातचीत करताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अॅरोगंट म्हटले आहे. 
- जयाप्रदा म्हणाल्या, पॉलिटिक्समध्ये माझी गाडी शंभरच्या वेगाने सुसाट निघाली होती. तेव्हाच एकदम ब्रेक लावण्यात आले आणि सर्वकाही थांबले. पॉलिटिक्स वाईट नाही, मात्र आझम खानसोबतच्या काही आठवणी वाईट असल्याची पूस्ती त्यांनी जोडली. 
 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी काय म्हणाल्या जयाप्रदा... 

बातम्या आणखी आहेत...