आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंट होती जिया खान, सुरज पांचोलीने टॉयलेटमध्ये फेकले होते भ्रूण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2013 मधील बहुचर्चित जिया खान आत्महत्या प्रकरणी CBI ने काल (बुधवार) चार्जशीट दाखल केली. त्यामध्ये अभिनेता सुरज पांचोलीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. सीबीआय रिपोर्टमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. रिपोर्टनुसार, जिया चार महिन्यांची गर्भवती होती. याविषयी तिने बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला सांगितले होते. त्यानंतर दोघांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या. तेव्हा सूरजने स्वत: हे भ्रूण काढून टॉयलेटमध्ये फेकले होते. या घटनेनंतर सूरज जियापासून दूर राहत होता. याचा जियाला मानसिक धक्का बसला होता.
 
गर्भधारणेची माहिती मिळताच गेले फिजिशिअनकडे- 
सीबीआय रिपोर्ट्सनुसार, जियाने सूरजला प्रेग्नेंसीविषयी सांगतिल्यानंतर दोघे फिजिशिअनकडे गेले. मात्र डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. नंतर दोघांनी एक गायनकोलॉजिस्टशी संपर्क साधला. त्यांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्या घेतल्यानंतर जियाला प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. ती खूप घाबरली. तिने सूरजला फोन करुन मदत मागितली. जियाला प्रचंड त्रास होत होता, त्यामुळे तिला मेडिकल अटेंशनची गरज होती. सूरजने तिला धीर धरण्यास सांगितले. सल्ला घेण्यासाठी गायनकोलॉजिस्टला फोन केला. गायनकोलॉजिस्टने सूरजला सांगितले, की जियाला घेऊन रुग्णालयात या. तिचा गर्भपात झाला होता. पण भ्रूण तिच्या शरीरातच होते. भ्रूण शरीरातून बाहेर काढणे गरजेचे होते. 
 
सूरजने स्वत: काढले भ्रूण- 
गायनकोलॉजिस्टच्या सल्ल्यानंतरसुध्दा सूरजने जियाला रुग्णालयात नेले नाही. त्याला भिती होती, की कुणाला या प्रेग्नंसीविषयी माहित होऊ नये. असे झाले तर दोघांचे करिअर संपुष्टात येईल. अखेर, त्याने स्वत:च्या हाताने जियाच्या शरीरातून भ्रूण बाहेर काढले. टॉयलेटमध्ये फ्लॅश करुन ते फेकून दिले. 
 
या घटनेनेच जियाला आत्महत्येस प्रवृत्त केले - 
या घटनेनंतर जिया खचून गेली होती. त्यानंतर 3 जून 2013ला तिने आत्महत्या केली. तिचा मृतदेह जुहू येथील तिच्या घरी बेडरूममध्ये आढळून आला होता. घटनेच्या 13 महिन्यांनी मुंबई हायकोर्टने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. जियाची आई राबिया खान यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती, त्यामध्ये त्यांनी दावा केला होता, की जियाने आत्महत्या केली नाही. तिचा खून झाला आहे. या कारणाने हायकोर्टाला हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे लागले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, जियाने सूरजला लिहिलेले अखेरचे पत्र...  
बातम्या आणखी आहेत...