आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jio MAMI Film Festival Will Give Chance To New Talent

\'जिओ मामी\' फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळणार क्रिएटिव्ह टॅलेंटला संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून करन जोहर, अनुपमा चोप्रा, नीता अंबानी आणि किरण राव)
मुंबई अॅकाडमी ऑफ मूव्हिंग इमेजेज अर्थातच जिओ मामी 17वा फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करत आहे. त्यामध्ये ऑफबीट आणि नवोदित दिग्दर्शकांचे सिनेमे समोर आणणार आहेत. 29 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत होणा-या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहा विविध श्रेणी इंटरनेशनल कॉम्पिटिशन, इंडिया गोल्ड, डायमेन्शन मुंबई, वर्ल्ड सिनेमा, द इंडियन स्टोरी, रेस्ट्रोपॅक्टिव्हेस किंवा होमेज अंतर्गत ऑफबीट निर्मात्यांना आणि नवोदित कलाकारांचे सिनेमे स्वीकार केले जातील.

इतकेच काय, मामीमध्ये विविध श्रेणींमध्ये निवडण्यात आलेले सिनेमे देश-परदेशातील सिनेसृष्टीतील दिग्गजांसमोर प्रदर्शित केले जाणार आहे. तसेच परदेशात होणार फेस्टिव्हलमध्येसुध्दा या सिनेमांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे.
फेस्टिव्हल दिग्दर्शक अनुपमा चोप्रा यांनी सांगितले, 'आम्ही देशातील प्रत्येक भागात दडलेल्या दिग्दर्शकाचे विचार आणि कहाण्या पुढे आणण्याचा विचार करत आहोत.'
मागील वर्षी फेस्टिव्हलच्या माध्यमातून 'किल्ला', 'कोर्ट' या मराठी सिनेमांना प्रेक्षकांनी पसंत केले. आम्हाला ही प्रक्रिया निपक्ष ठेवायची आहे, म्हणून परदेशी ज्यूरीचे सदस्य हिंदी सिनेमांची निवड करतील. आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या निवडीमध्ये भारतीय सिनेमांचे तज्ञ असतील.
किरण राव, सिनेमा दिग्दर्शक आणि चेअरपर्सन जिओ मामी- 'भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या स्वातंत्र्य शोकेसिंगवर आमचे संपूर्ण लक्षकेंद्रीत आहे. मामीच्या माध्यमातून सिनेमांच्या वितरणावर लक्षकेंद्रीत करत आहोत. सिनेमे सहजरित्या रिलीज झाले तर निर्मात्यांच्या समस्या संपतील.'