आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच बघा 102 कोटींचा गल्ला जमवलेल्या ‘जॉली एलएलबी 2’चे हे On Location फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या अक्षय कुमार स्टारर ‘जॉली एलएलबी 2’ या सिनेमाने आतापर्यंत 102.44 कोटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. या सिनेमात अक्षयने साकारलेली भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे सिनेमाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर उघड केले आहेत.
 
या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात भारतात शुक्रवारपर्यंत 81.85 कोटी तर भारताबाहेर 22 कोटींची कमाई केली होती. या सिनेमालाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. अर्थात प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्या दिवशी केला होता असे म्हटले चुकीचे करणार नाही. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सिनेमाने तब्बल 9.07 कोटींचा गल्ला कमविला होता.  ‘जॉली एलएलबी 2’ ने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा गल्ला जमविला होता. त्यानंतर ‘द गाझी अॅटॅक’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन देखील ‘जॉली एलएलबी 2’ ने 4.14 कोटींचा गल्ला जमविला. 

दुस-या आठवड्यातील जॉली एलएलबी 2ची कमाई.. 
 
शुक्रवार 17 फेब्रुवारी 4.14 कोटी
शनिवार 18 फेब्रुवारी 6.35 कोटी
रविवार 19 फेब्रुवारी 7.24 कोटी
सोमवार 20 फेब्रुवारी 2.48 कोटी
मंगळवार 21 फेब्रुवारी 2.45 कोटी
बुधवार 22 फेब्रुवारी 2.07 कोटी
 
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी 2’ सिनेमात अक्षयसह हुमा कुरेशी, अन्नु कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये.
 
लखनऊमध्ये झाले सिनेमाचे शूटिंग... 
'जॉली एलएलबी 2' चे बहुतेक शूटिंग उत्‍तर प्रदेशमधील लखनऊ शहरात झाले आहे. येथील चारबाग, चतर मंजिल, दिलकुशा गार्डन और गोमतीनगर लोहिया पथ या ठिकाणांवर अक्षय आणि हिमा कुरेशीमधील अनेक दृश्‍य शूट झाली आहेत. इतर को-स्‍टार्सचे अनेक सीन्‍सदेखील या ठिकाणांवर शूट झाले आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पहिल्यांदाच बघा, ‘जॉली एलएलबी 2’चे ऑन लोकेशन फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...