आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जॉली एलएलबी 2\'च्या प्रदर्शनाला हायकोर्टाचा हिरवा कंदील, काही सीन्स वगळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जॉली एलएलबी-२ या चित्रपटामधील तीन दृश्ये वगळावीत, असा अहवाल  आैरंगाबाद हायकोर्टाद्वारे नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिला. उपरोक्त अहवाल सोमवारी (६ फेब्रुवारी) हायकोर्टात सादर करण्यात आला.  न्यायाधीशांच्या डायसवर मारलेली उडी, बूट फेकण्याचे दृश्य आणि ‘क्या अकल लडाई है’ हा डायलॉग काढून टाकण्यासंबंधी निर्माता -निर्देशकांनी न्यायालयात सांगितले. खंडपीठाचे न्या. संभाजीराव शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी अहवालानुसार सुधारणा करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले.   

नांदेड येथील अॅड. अजयकुमार वाघमारे यांनी ही याचिका दाखल केली. जॉली एलएलबी- २ या चित्रपटाच्या  ट्रेलरमध्ये वकील, पोलिस अधिकारी आणि इतर व्यक्ती न्यायालयाच्या परिसरात पत्ते खेळतात. ते न्यायमूर्तींच्या डायससमोर धावून जातात व  जोरदार मारामारीही करतात. 
वकील न्यायाधीशांसमोरील डायसवर उडी मारून बसतो. आपल्या बाजूने निकाल देण्याची विनंती करतो. न्यायाधीश टेबलाखाली लपून ऑर्डर-ऑर्डर असे हातात हातोडा घेऊन म्हणताना यात दाखविलेले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय लखनौ असे लिहिलेल्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर वकील या परिसरातच नृत्यही करतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे, असे लिहून चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने न्यायव्यवस्था व वकिली व्यवसायाची क्रूर चेष्टा केली आहे. या दृश्यांमुळे लोकांच्या मनात न्यायसंस्थेविषयी संशयाची तसेच अनादराची  भावना निर्माण होईल, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता.   
त्रिसदस्यीय समितीची  नियुक्ती  : यापूर्वीच्या  सुनावणीअंती खंडपीठाने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित आणि डॉ. कानडे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आणि दोन दिवसांत या समितीला चित्रपट दाखविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समितीला हॉटेल ताजमध्ये सिनेमा दाखविण्यात आला. समितीने दोन दृश्ये व एक डायलॉग काढण्यासंबंधीचा अहवाल सादर केला. निर्मात्याने समितीच्या अहवालानुसार दृश्ये कट करण्यासंबंधी निवेदन केले. उपरोक्त निवेदनास हायकोर्टाने मान्यता प्रदान केली. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड.  व्ही. डी. साळुंके व अॅड. पंडितराव अाणेराव, तर प्रतिवादींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम.  शहा, अॅड. धीरज जेथलिया  यांनी काम पहिले.
 
वकिली व्यवसायाच्या बदनामीचा ठपका  
वकिली व्यवसायाबद्दल बदनामीकारक चित्रीकरण करण्यात आले आहे. या व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केली आहे, असा आक्षेपही याचिकेत घेण्यात आला होता.  

निर्मात्याने दाखल केले शपथपत्र  
चित्रपट १० फेब्रुवारी रोजी १० देशांमध्ये ४०० चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्याने शपथपत्रात नमूद केले होते.  या चित्रपटाचे केवळ ट्रेलर पाहून चित्रपटाबाबत निर्णय घेण्यात येऊ नये. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला  सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेले आहे आणि ती अशा प्रमाणपत्रांसाठी अधिकृत संस्था आहे, असे म्हणणे मांडले होते.   
 

पुढे वाचा, एलएलबी शब्द वगळण्याची करण्यात आली होती मागणी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...