Home »News» Judwaa 2 Actress Taapsee Pannu Trolled For Wearing Bikini

बिकिनी पाहून ट्रोलर म्हणाले, हे ही काढून टाक.. तापसीने असे दिले सडेतोड उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 12:04 PM IST

मुंबई - तापसी पन्नू सध्या तिचा अपकमिंग चित्रपट 'जुडवां-2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यानच तिने ट्विटरवर स्काय ब्लू ब्लू कलरची फ्लोरल प्रिंट असलेल्या बिकिनीवरील एक फोटो शेयर केला. तो फोटो पाहून सोशल मीडिया यूझर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तापसीही शांत बसून राहिली नाही. तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

असे दिले उत्तर..
- तापसीने तिच्या अकाऊंटवर जे पोटो शेयर केले आहेत, ते 'आ तो सही' या गाण्यातील लूकचे आहेत.
- या बिकिणी पोटोवर यूझर्सने नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
- एका यूझरने तिला म्हटले, 'आपल्या देशात स्वातंत्र्य आहे, मग एवडे तरी कपडे का ठेवले..'
- एवढ्यावरच न थांबता यूझरने पुढे लिहिले, हे फोटो पाहून तुझ्या भावाला किती गर्व वाटत असेल ना..
- तापसीला या कमेंटचे वाईट वाटले नाही, उलट तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर देत लिहिले, सॉरी मला भाऊ नाही, नाहीतर नक्की विचारले असते. सध्यासाठी बहिणीचे उत्तर चालेल का.
- तापसीला भाऊ नाही, तिला फक्त एक लहान बहीण शगुण आहे.

जेव्हा यूझरने बिकिनी फोटोला म्हटले घाणेरडा..
- तापसीला ट्रोल करणारे एवढ्यावरच थांबले नाही. एकाने ट्वीट केले, कमीत कमी घाणेरडे फोटोवर अपलोड करू नका. घाणेरडे चित्रपट तयार करून आधीच देशाची पिढी उध्वस्त करत आहात तुम्ही.
- त्याचेही तापसीने मजेशीर उत्तर दिले.. घाणेरड? हो मला माहिती आहे, रेती स्वच्छ करायला पाहिजे होती. यापुढे मी काळजी घेईल.
- तापसीच्या 'आ तो सही' या गाण्याचे सध्या फक्त टिझर रिलीज झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, तापसी पन्नूच्या बिकिनी फोटोवर आलेले ट्रोल करणारे ट्वीट्स.. अखेरच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा टिझर..

Next Article

Recommended