Home »News» Juhi Chawla Daughter Jhanvi Mehta, Juhi Chawla Birthday Speical

लाइमलाइटपासून दूर राहाते जुही चावलाची मुलगी, लंडनमध्ये घेत आहे शिक्षण

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 10:31 AM IST

  • जुही चावला आणि तिची मुलगी जान्हवी.
बॉलिवूड अॅक्ट्रेस जुही चावलाचा आज 50वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 ला अंबाला (हरियाणा) येथे झाला होता. जुहीने 1995 मध्ये बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलगी जान्हवी (2001) आणि मुलगा अर्जुन (2003). जुहीने तिच्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दुर ठेवले आहे. जान्हवी आणि अर्जुन कधीही कोणत्याच बॉलिवूड पार्टी किंवा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत.
जान्हवी लंडनमध्ये घेते शिक्षण
- जुहीची मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन यांचे शिक्षण मुंबईत धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी दोघांनाही लंडनमध्ये पाठवण्यात आले. जान्हवी आणि अर्जुनचे अॅडमिशन जुही आणि जय मेहतांनी यूकेच्या बोर्डिंग स्कूल चार्टर्ड हाऊसमध्ये केले आहे. याच वर्षी जुहीने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला होता. तेव्हा जान्हवीने स्कूलमध्ये पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. जुहीने मुलीचा फोटो शेअर करताना लिहिले होते, Can't believe my brilliant little girl ..!!!!🙏🙏🙏so proud of her'.
जुहीने एका मुलाखतीत सांगितले, होते की तिच्या मुलांना फिल्ममध्ये इंट्रेस्ट नाही. जान्हवीला रायटर बनण्याची इच्छा आहे. त्यासोबतच जुहीने हेही सांगितले होते, की जान्हवीला लो-प्रोफाइल राहायला आवडते. एवढेच नाही तर ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नाही. मात्र जान्हवी दीपिका पदुकोण आणि वरुण धवनची फॅन आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जुही चावला आणि फॅमिलीचे फोटोज....

Next Article

Recommended