आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abir Bedi's Newly Wife Parveen Is Four Years Younger To Daughter Pooja Bedi.

मुलीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे कबीर बेदीची चौथी पत्नी, 'पंजाबी शेरनी' म्हणून मारतात हाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवीन दोसांज-कबीर बेदी, पूजा बेदी - Divya Marathi
परवीन दोसांज-कबीर बेदी, पूजा बेदी

मुंबईः १५ जानेवारी रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण करणा-या कबीर बेदी यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांची लाँग टाईम गर्लफ्रेंड परवीन दोसांज (४१) सोबत लग्न केले. हे त्यांचे चौथे लग्न आहे. कबीर यांची ही नवी पत्नी त्यांची मुलगी पूजा बेदी (४५) पेक्षा वयाने चार वर्षे लहान आहे. गेल्या १० वर्षांपासून कबीर आणि दोसांज लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जाणून घेऊयात परवीनविषयी...
पंजाबी कुटुंबात लंडनमध्ये झाला जन्म
परवीनने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून ती पंजाबी कुटुंबातील सदस्य आहे. गुरमुखी नीट वाचता येत असल्याचे तिने सांगितले. इतकेच नाही तर कबीर बेदी तिला पंजाबी शेरनी म्हणून हाक मारत असल्याचेही तिने या मुलाखतीत उघड केले होते.
कशी झाली होती कबीरसोबत पहिली भेट...
परवीन आणि कबीर यांची पहिली भेट लंडन येथे एका नाटकादरम्यान झाली होती. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सेंट्रल लंडनच्या शेफ्ट्सबरी थिएटरमध्ये कबीर यांचा प्ले होता. परवीन आपल्या काही मित्रांसोबत त्यांचे नाटक बघायला गेली होती. तिथेच दोघांची पहिली भेट झाली, भेटीचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात झाले आहे.
कुटुंबियांना पसंत नव्हते दोघांचे नाते...
परवीनने सांगितल्याप्रमाणे, तिच्या फॅमिली मेंबर्सना कबीरसोबतचे तिचे नाते पसंत नव्हते. मात्र नंतर त्यांनी या नात्याला संमती दिली.
आफताब शिवदासानीचे साडभाऊ झाले कबीर बेदी...
परवीनसोबत लग्नानंतर कबीर बेदी, अभिनेता आफताब शिवदासानीचे साडभाऊ झाले आहेत. आफताबची पत्नी निन दोसांज परवीनची धाकटी बहीण आहे. परवीनला एकुण सहा बहिणभावंड असून ती सगळ्यात मोठी आहे. तिचा भाऊ परविंदर एका बँकेत कामाला असून बहीण कलविंदरचे ब्युटी स्पा आणि बिझनेस आहे. तर आणखी एक बहीण सुकी ही सोनी म्युझिकसाठी काम करते. लंडन आणि मुंबईत ती वास्तव्याला असते. तिसरी बहीण निन जी आफताबची पत्नी आहे, ती हाँगकाँगमध्ये एका लग्झरी ब्रॅण्डसाठी काम करते. सर्वात धाकटा भाऊ कुलदीप बँकर आहे.
बालपणीच वडिलांपासून विभक्त झाली परवीन...
बालपणीच वडिलांपासून वेगळी झाल्याचे परवीनने एका मुलाखतीत सांगितले होते. आपली आई एक सर्वसामान्य महिला असून आध्यात्मावर विश्वास ठेवणारी असल्याचे ती म्हणाली होती.
UK मध्ये सरकारी कन्सलटंट होती परवीन...
भारतात येण्यापूर्वी यूके सरकारमध्ये परवीन कन्सलटंट म्हणून काम करायची. भारतात तिची ओळख कबीर बेदीची NRI गर्लफ्रेंड म्हणून झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, परवीन दोसांजची छायाचित्रे...