आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलने इंडस्ट्रीत पूर्ण केली 25 वर्षे, म्हणाली- आजपर्यंत मी एकही शूट कँसल केले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल. - Divya Marathi
काजोल.

मुंबई - 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ-कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम' सारखे सुपरहिट सिनेमे देणारी काजोलच्या फिल्म इंडस्ट्रीतील कारकिर्दीला 25 वर्षे झाली आहे. बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल काजोल म्हणाली की मी एवढी वर्षे काम केले पण एकदाही शूटिंग कँसल केले नाही. 

 

एका इंटरव्ह्यूमध्ये अनेक इंट्रेस्टिंग खुलासे... 
- एका मुलाखतीत काजोल म्हणाली, तुम्ही एका अशा इंडस्ट्रीमध्ये काम करत असता की येथे तुम्ही आजारी पडल्याने शूट कँसल होते त्याचा भूर्दंड एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला लाखो रुपायांनी भरावा लागतो. 
- काजोल म्हणाली, मी माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही शूट कँसल केले नाही. पूर्ण इमानदारीने सांगते की कधीही माझे फ्लाइट मिस झाले नाही, किंवा लेट झाले नाही, ज्यामुळे मला शूट कँसल करावे लागले. 
- काजोल म्हणते, की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असते त्याची हेल्थ. मोठे वर्क शेड्यूल, खाण्या-पिण्याची आणि अवेळी झोपेची सवय याचा तब्यतीवर परिणाम होतो. सोबतच तुम्हाला कायम फ्रेश दिसणे आवश्यक असते. 
- काजोल सध्या 43 वर्षांची असून आपल्या सिल्व्हर ज्यूबली कारकिर्दीबद्दल ती म्हणाली, एकच दिवस मी ऑफ घेतला होता, त्या दिवशी माझी मुलगी न्यासाची तब्यत ठिक नव्हती. तिला 104 ताप होता. त्या दिवशी मी प्रोड्यूसरला सांगितले होते की आज मी येऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...