आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:बीफ पार्टीवर काजोलने दिले स्पष्टीकरण, म्हटले \'ते होते म्हशीचे मटण\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काजोलचा एक व्हिडिओ खूप वायरल झाला होता, ज्यात ती आपल्या मित्रपरिवारासोबत बीफ पार्टी करताना दिसून येत आहे. यानंतर काजोलला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते तसेच त्यावर संतप्त प्रतिक्रियाही येत होत्या. काजोलने आता स्पष्टीकरण देत सांगितले आहे, की ते गायीचे मांस नसून म्हशीचे मटण होते. तिने ट्विटरवर हे सर्व सांगितले. 
 
काजोल म्हणाली, 'हा एक संवेदनशील मुद्दा आहे त्यामुळेच याचे स्पष्टीकरण मी देत आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये अशी माझी इच्छा आहे.' 
 
काजोलनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता पण त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्याने तिने तो काढून टाकला. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, काजोलने ट्विटरवर केलेले स्पष्टीकरण..
बातम्या आणखी आहेत...