आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: कल्किने सिनेमा आणि खासगी आयुष्यावर केली बातचीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कल्कि कोचलिन)
जगभरात प्रेक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर 'मार्गरिटा, विद अ स्ट्रॉ' सिनेमा भारतात 17 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. आपल्या भूमिकेच्या तयारीसाठी मुख्य अभिनेत्री कल्कि कोचलिनने दिग्दर्शिका शोनाली बोसची सेरिब्रेल पाल्सीने त्रस्त कजिन मालिनीसोबत वेळ घालवला. ती दिल्लीमध्ये शोनालीच्या छोट्या घरात राहिली. तिथे तिने तिच्या कारमधून प्रवास केला. अभिनेता आदित्य हुसैनने एक अनुभवी अॅक्टींग ट्रेनर कल्किला सूचित केले.
आपल्या यशाविषयी, आई, अनुराग कश्यप, लव्हलाइफ, अभिनय आणि इतर गोष्टींवर कल्किने बातचीत केली...
सिनेमात विना पंचतारांकित हॉटेल आणि विना व्हॅनिटी व्हॅनचे काम केलेस?
माझे घर खूप छोटे आहे. मी स्विफ्ट कार चालवते. थिएटरदरम्यान आम्ही ट्रेनने प्रवास करतो. फाइव्ह स्टारमध्ये बसणे चांगले वाटते, नाही बसलो तरी तितका फरक पडत नाही. माझ्यासाठी भूमिका आव्हानात्मक असणे गरजेचे आहे. मला पैसा नकोय असे मी म्हणत नाहीये, परंतु कष्टाचा हवाय.
- सामान्य तरुणी आपल्या इच्छा आईलासुध्दा सांगू शकत नाही आणि हा सिनेमाच लैलाच्या स्वप्नांविषयी आहे.
तिच्या विचाराने तिची आईसुध्दा नाराज होते. लैला थोडी चालू आहे. प्रेम करते, प्रेमभंग झाल्यावर खचून जाते. याला काही लोक फेमिनिस्ट सिनेमाप्रमाणे पाहत आहेत. परंतु यूरोपच्या प्रेक्षकांसाठी असे नाहीये. त्यांच्यासाठी नारीवाद म्हणून बरोबरीने उभा राहून हक्काची लढाई लढणे आहे. आपल्या देशात अनेक भागांत आजही अनेक लोक शंभर वर्षे मागे आहेत.
हा सिनेमा सेलिब्रेशन ऑफ लाइफ आहे. अक्षमतेमुळे तुम्ही जगणे सोडू शकत नाही.
तू किशोरवयीन असताना आईसोबत इतक्या मनमोकळ्यापणाने बोलू शकली होतीस?
माझी आईने मला मासिक पाळीविषयी सांगितले होते, 'सेक्सविषयी बातचीत केली होती. गर्भ निरोधकाविषयी सांगितले होते. मी नशीबवान आहे, तिने माझ्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलली. तेव्हापासून मी असुरक्षित संबंध कधीच केले नाही. अन्यथा सर्वजण याला लपूनच ठेवतात. आजसुध्दा अनेक 35 पार केलेले तरुण आपल्या आई-वडिलांना न सांगता सिगारेट पितात.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कल्किने आणखी कोण-कोणत्या गोष्टींवर केली बातचीत...