आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalki's Character In 'Margarita With A Straw' Came Together For Promotion

PHOTOS : कल्कि नव्हे ही आहे खरी 'मार्गरिटा', सिनेमाच्या प्रमोशनला होती हजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कल्कि कोचलिन, मालिनी चिब, दिग्दर्शिका शोनाली बोस)
मुंबईः क्लिक कोचलिन स्टारर 'मार्गरिटा विद द स्ट्रा' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. या सिनेमाला समीक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. शिवाय सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने 2.12 कोटींचा व्यवसाय केला.
'मार्गरिटा विद द स्ट्रा' हा सिनेमा सेरेब्रल पल्सीने पीडित असलेल्या मालिनी चिब या तरुणीच्या खासगी आयुष्यावर बेतलेला आहे. कल्किने सिनेमात मालिनीची भूमिका साकारली आहे.
कल्कि कोचलिन, शोनाली बोस, नीलेश मनियार यांच्यासोबत मालिनी चिब गेल्या काही दिवसांत या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली.
दिग्दर्शिका शोनाली बोस यांना या विषयावर सिनेमा बनवण्याची प्रेरणा मालिनी चिबने लिहिलेल्या 'वन लिटिल फिंगर' या पुस्तकातून मिळाली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मार्गरिटा...'च्या प्रमोशन टीममध्ये हजर असलेल्या मालिनी चिबची छायाचित्रे...