आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे कमाल खान, घटनेवेळी सलमानसोबत कारमध्ये होता बसलेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सलमान खान आणि कमाल खान)
मुंबई- सलमान खानशी निगडीत बहुचर्चित 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिस निरिक्षक रविंद्र पाटीलचा मृत्यू झाल्यानंतर कमाल खान हा एकमेव अशी व्यक्ती आहे, जो या प्रकरणात साक्ष देऊ शकेल.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलांनी साक्षीदार म्हणून कमाल खानला बोलावण्यासाठी मागणी केली असता, तो कुणालाही सापडला नाही. अखेर कमाल खान कोण आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला असावा. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगत आहेत, ज्या कमाल खानशी निगडीत आहेत.
घटनेच्या रात्री सलमानसोबत कमाल खान-
सांगितले जाते, की घटनेच्या रात्री अर्थातच 2002मध्ये हिट अँड रन प्रकरण घडले तेव्हा त्या रात्री कमाल खान सलमानसोबत त्याच्या Land Cruiser कारमध्ये होता. परंतु पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर तो या प्रकरणात सामील झाला नाही.
कमाल सांगितले होते, सलमान चालवत होता गाडी-
अलीकडेच वकील आभा सिंह यांनी कमाल खानला कोर्टात उपस्थित राहण्याची मागणी केली. कारण सलमान खानचा बॉडीगार्ड रविंद्र पाटीलच्या मृत्यूनंतर या प्रकरणात कमाल खान हा एकमेव साक्षीदार साक्ष देऊ शकेल. रिपोर्ट्सनुसार, 4 ऑक्टोबर 2002 रोजी पोलिसांना दिलेल्या जबाबात कमाल खानने घटनेवेळी सलमान गाडी चालवत होता आणि तो मागच्या सीटवर बसलेले होता, असे सांगितले होते.
कमालने घटनास्थळावरून काढला पळ-
रिपोर्ट्सनुसार, घटनेवेळी कमाल खानने संधी पाहताच तिथून पळ काढला होता. परंतु कोर्टात सलमान खानने याला नाकारले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कमाल खानविषयी आणखी काही गोष्टी...