आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana And Her Lawyer Slammed Hrithik, Even Calling Him Desperate

हृतिक-कंगना वाद: मुलांना घेऊन परदेशात गेली सुझान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: हृतिक-कंगना ईमेल हॅकिंग वाद सुरु असताना हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान मुलांना घेऊन परदेशात गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनासोबतच्या वाढत्या वादामुळे हृतिकने दोन्ही मुलांना यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुझान एक आठवड्यासाठी तुर्कीला गेली आहे. कंगना आणि हृतिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दोघे एकमेकांना वकिलांव्दारे निशाणा साधत आहेत. ईमेल्स लीक झाले आहेत. पोलिस लवकरच कंगनाचा जबाब नोंदवणार आहे.
हृतिकने विचारले, 'अखेर कंगना का भांडतेय...'
- यापूर्वी हृतिकचे वकिल दीपेश मेहता यांनी सांगितले, की तो त्याची प्रतिमा जपण्यासाठी हा खटला लढतोय. हृतिकवर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत.
- हृतिकचे वकिलांचा जबाब कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांच्या शुक्रवारी समोर आलेल्या जबाबानंतर पुढे आले. त्यात सिद्दीकीने लीक ईमेल्सच्या सत्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
- हृतिकच्या वकिलांनी शनिवारी सांगितले, 'आमच्याकडे या वादाचे आणखी एक ठोस कारण आहे. हृतिकवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. सध्या आम्ही प्रॉसिझर्स फॉलो करतोय. एक ना एक दिवस सत्य समोर येणार.'
- माझा क्लाइंट (हृतिक) स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी लढत आहे. परंतु आम्हाला माहित नाहीये, की कंगना वाद का घालतेय.
- हृतिकवर ज्याप्रकारे आरोप लावण्यात आले आहेत, त्याच्यावर ज्या प्रकारे हल्ला केला जातोय, ते अविश्वसनीय आहे.
- आम्ही यामागील अद्याप कारण समजू शकलेलो नाहीये.
- कंगनाच्या वकिलांनी लीक ईमेल्सच्या सत्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सिद्दीकी यांनी ईमेल्सचे ट्रान्सक्रिप्टला अनरिलायबल आणि अनव्हेरिफाइड सांगितले आहे.
कोर्टाने US फर्मकडून मागितली माहिती...
- यादरम्यान मुंबईच्या एका कोर्टाने अमेरिकेच्या एका फर्मकडून या प्रकरणाविषयी सर्व माहिती मागितली आहे. हृतिकचे बनावट ईमेल आयडी यूएसच्या फर्मकडे रजिस्टर्ड होते.
- अॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट एआर नातूने अमेरिकन फर्म मेल अँड मीडिया इंकच्या अथॉरिटीजविषयी शुक्रवारी नोटीस सादर केली.
- कोर्टाने हा आदेश सायबर क्राइम सेल याचिकेवर दिला आहे. त्यात अमेरिकन फर्मला नोटीस पाठवण्याची मागणी करण्यात आली होती.
कंगनाचे वकील म्हणाले, कोणतीही मर्यादा ओलांडू शकतो हृतिक...
- पोलिसांना पूरावे म्हणून हृतिकने काही ईमेल सोपवले होते. त्यावर कंगनाने वकिलांमार्फत शुक्रवारी जबाब दिला आहे.
- कंगना म्हणाली, 'अनव्हेरिफाइड ईमेल्स लीक केले जात आहेत. यावरून सिद्ध होते, की हृतिक कोणतीही पातळी गाठू शकतो. तो स्वत:ला सिली एक्स असल्याचे सिध्द करतोय.'
- यापूर्वी कंगनाचे अनेक कथिल ईमेल्स समोर आले आहेत.
कंगना हृतिकला म्हणाली होती, 'शांतता सहन होत नाही', समोर आले अनेक emails...
यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी नवीन ईमेल समोर आले, हे ईमेल कंगनाची बहीण रंगोली आणि हृतिकने एकमेकांना पाठवले होते. यावरून माहिती होते, की रंगोलीने मान्य केले होते, की हृतिकचे अकाऊंट हॅक झाले आहे. परंतु काही वेळेनंतर पुन्हा बातचीत सुरु झाली. कंगनाने हृतिकला 6 महिन्यात 3000 मेल पाठवले. कधीकधी तर प्रत्येक 6 मिनिटांना एक मेल केला आहे.
5 मेपासून 25 मेपर्यंत 2014दरम्यान कंगनाची बहीण रंगोली आणि हृतिक यांच्यात हे ईमेल झाले...
1# हॅकर किंवा हृतिकचा कंगनाला ईमेल : 'मी अनेक ईमेल पाहिले. दुस-या कपल्सपेक्षा आपले आयुष्य वेगळे आहे. मी एक व्हिडिओ पाहिला. चांगला होता. मला आणखी हवे होते, परंतु तू आजारी होतीस.'
2# कंगनाची बहीण रंगोली : 'कंगनाचा एक ईमेल तू मला चुकीने पाठवला होता. या चुकीने सर्व समोर आले आहे. तू कंगनाचे अकाऊंट हॅक केले आहे आणि तिला अनेक व्हिडिओ रेकॉर्ड करायला आणि पिक्चर्स क्लिक करायला सांगितले आहे.'
3#. हृतिकचा रंगोलीला ईमेल : मला येऊन भेट. मला नाही माहित तू काय म्हणतेयय मी असा कोणताच ईमेल पाठवला नाहीये. मी 27 तारखेनंतर फ्री आहे. भेटून हे प्रकरण सोडव. hroshan@email.com माझे अकाऊंट नाहीये रंगोली. कुणीतरी माझ्यासोबत ट्रिक खेळतोय.
4#. रंगोलीचा हृतिकला ईमेल : 'मी सरळ बोलणारी व्यक्ती आहे. कंगना तुला ईमेल्स, व्हिडिओ, पिक्चर्स पाठवत होती. मागील 6 महिन्यात तिला तुझ्याकडून अनेक ईमेल्स मिळाले. त्यानंतर तिचे अकाऊंट हॅक झाले. आम्ही हे प्रकरण सोडवण्यासाठी तयार आहोत. आपण मिळून तक्रार दाखल करू शकतो. कारण जर काही बरेवाईट झाले तर त्यात तुझेसुध्दा नाव घेतले जाईल.'
जुलै 2014मध्ये कंगनाच्या आईडीवरून पाठवण्यात आलेले ईमेल...
- हृतिकने कंगना आणि रंगोलीला नवीन ईमेल आयडी असल्याचे सांगितले.
- त्यावर कंगनाने कथितरित्या 6 महिन्यात 3000 ईमेल्स पाठवले.
- कंगनाने जुलै 2014मध्ये कथितरित्या लिहिले, 'मी तुला माझे पुढील ईमेल पाठवण्यापूर्वी तुला कशाप्रकारचे ईमेलहवे आहेत? दुसरा अकाऊंट बनवायचे आहे, की आपण टेक्स मॅसेजच पाठवायचे आहेत?'
- त्यानंतर ऑगस्ट 2014मध्ये कंगनाने लिहिले, 'तुझा प्लान काय आहे बेबी. तुझ्याकडे दुसरा ईमेल आयडी आहे तर बातचीत करण्यासाठी त्याचा वापर कर. तू शांत राहिलेल सहन होत नाही. तू दुसरा ईमेल आयडी का बनवत नाही.'
कंगनाने आणखी काय लिहिले होते?...
1# आपल्यात खरंच प्रेम आहे?
एका ईमेलमध्ये कंगनाने कथितरित्या लिहिले होते, 'कधी-कधी मला खात्री पटत नाही. आपल्यात खरंच प्रेम आहे का, की हे फक्त फँटसी आहे? आपले प्रेम खरे आहे की मी एखाद्या इमेजनरी व्यक्तीविषयी बोलतेय?'
2# मी सिंड्रोमची शिकार आहे.
कंगनाने लिहिले होते, 'मला Asperger's Syndrome आहे. मी यामुळे तणावात आहे. तुला वेळ मिळाला तर वाच. मी या सिंड्रोमची 98% शिकार आहे.'
3# बालपणी तुला पाहून हरवून गेले होते...
- मी तुला बालपणी मनालीच्या एका हिंदी वर्तमानपत्रात पहिले होते. मी स्वत:मध्ये हरवून गेले होते. त्यानंतर स्वत:ला म्हणाले, ही व्यक्ती माझ्यासाठी आहे.
4#. वास्तवातून बाहेर पडू शकेल?
कंगनाने लिहिले होते, 'एखाद्या दिवशी मी तुला भेटेल आणि तु म्हणशील, की तुला काहीच मिळाले नाही? तू मला ओळखत नाहीस, तू माझ्यावर कधीच प्रेम केले नाही. काय होईल तेव्हा? मी या दु:खातून बाहेर कशी पडू?'
पुढे वाचा, का आहे संपूर्ण प्रकरण?... आणि पाहा कंगनाने हृतिकला पाठवलेले ईमेल्स...