आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Drags Deepika, Priyanka Against Hrithik In Her Mail

खोटं बोलतोय हृतिक, हृतिकने कंगनाला अशी मारली होती मिठी, बघा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिकतचा दावा आहे, की तो कधीच कंगनाला पर्सनली भेटला नाही. परंतु हा फोटो त्याचा हा दावा खोटा ठरवत आहे. - Divya Marathi
हृतिकतचा दावा आहे, की तो कधीच कंगनाला पर्सनली भेटला नाही. परंतु हा फोटो त्याचा हा दावा खोटा ठरवत आहे.
मुंबई: हॅकिंग वादात कंगना रनोट आणि हृतिक रोशन यांच्यात सुरु असलेल्या वादाने नवीन वळण घेतले आहे. कंगनासोबतचे रिलेशनशिप सतत नाकारत असलेल्या हृतिकचा एक फोटो समोर आला आहे. त्यात तो कंगनाला मिठी मारताना दिसतोय. फोटोवरून असे दिसते, की हृतिकचा हा दावा खोटा, की तो कंगनाला कधीच पर्सनली भेटला नाही.
कंगनाचे आणखी काही मेल समोर आले...
- कंगनाने हृतिकला पाठलेले आणखी काही ईमेल्स लीक झाले आहेत. त्यात ती प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूरसारख्या अभिनेत्रींची नावे घेत आहेत.
- लीक झालेल्या आणखी एका ईमेलमध्ये कंगना कथितरित्या हृतिकवर तिचे मेल अकाऊंट हॅकरला हरियाणवी भाषेत शिवीगाळ करून धमकी देताना दिसते.
- ती म्हणतेय, की गुपचुप निघून जा नाही तर आयुष्यभर चारित्र्यावर दाग लागेल. यादरम्यान हृतिक या प्रकरणात महेश भटची मदत घेत आहे.
अटेंशन न मिळाल्याने अस्वस्थ झाली कंगना...
- एका वेबसाइटने दोन नवीन मेल समोर आल्याचा दावा केला आहे. जे कथितरित्या कंगनाने हृतिकला पाठवले होते.
- एका मेलमध्ये कंगना हृतिकवर तिचा मेल अकाऊंट हॅक केल्याचा आरोप लावत आहे.
- कंगनाने हृतिकला या प्रकरणातून दूर राहण्याससुध्दा सांगितले आहे. काही मेलमध्ये कंगना हॅकरलासुध्दा धमकावताना दिसते.
- 22 ऑगस्ट 2014ला पाठवलेल्या या मेलमध्ये कंगनाने सांगितले, 'बेबी, (हृतिक) तू मला मेल का करत नाहीये. तू माझ्यासोबत बोलतसुध्दा नाहीये. लव्हर म्हणून मला तुझ्याकडून कधीच अटेंशन मिळाले नाही. आता मित्र म्हणूनसुध्दा सर्व नाते तोडले?'
- 'तू मला मेलसुध्दा करू शकत नाही का? तू मला HI सुध्दा म्हणू शकत नाही का. तुझ्या गाण्यावरील माझ्या रिस्पॉन्सला थँक्ससुध्दा म्हणू शकत नाही का.'
- 'तू माझ्या बर्थडेलासुध्दा आला नाहीस. तू कधीच माझ्या कामाविषयी बातचीत केली नाही. असे वाटतेय, की तुझ्यासाठी मी कुणीच नाहीये.'
- 'तू प्रियांका चोप्रा, दीपिका आणि सोनमपर्यंत सर्वांच्या कामाची प्रशंसा केली. माझ्यासोबत असा भेदभाव का?'
कंगना कुणाला म्हणाली होती, 'पंगा घेऊ नकोस, निघून जा'
- कंगनाने 19 नोव्हेंबर 2014ला hroshan@mac.comवर पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले होते, 'तू आजही माझे ईमेल्स चेक करतोय? डम्बो! माझी हरियाणवी ट्यूटर रोज येते आणि मी रोज एकापेक्षा एक शिव्या शिकतेय. तू पंगा घेऊ नकोस, नाहीतर आयुष्यभर Scar होशील. कोणतीच थेरपी चालणार नाही. भिंतीवर डोके आपटताना दिसशील.'
- 'मुर्खा, जर मला माहितीये, की माझे मेल अकाऊंट हॅक केलय तर मी यावर पर्सनल कॉन्फिडेन्शिअल कम्युनिकेशन कसे करेल? तुझ्या डोक्यात भूसा भरला आहे का? का वेळ वाया घालवतोय.'
- 'तुझ्या लायकीची मुलगी बघ आणि तिथे डोके लाव. जास्त मोठे स्वप्न पाहू नकोस. माझ्या घराबाहेर रांग लागली आहे. चांगल्या चांगल्यांना माझी अपॉइंटमेंट मिळत नाही. तुला एक चॅरिटी प्रोजेक्ट समजले होते. परंतु ज्याला खड्ड्यातून बाहेर काढावे तोच खड्ड्यात ढकलतो. वाह!'
- 'का तुला तुझी प्रतिमा प्रिय नाहीये? गुपचुप सर्वकाही विसरून निघून जा माझे ईमेल चेक करणे बंद कर.'
महेश भट्ट काय म्हणाले?
- हृतिकने या वादात महेश भट यांच्याकडे मदत मागितली आहे.
- यावर महेश भटने एका बॉलिवूड पोर्टल सांगितले, 'मी या प्रकरणात यासाठी आलोय, कारण हृतिकने माझ्याकडून एक जेष्ठ म्हणून सल्ला मागितला होता. मी त्याला सांगितले, की जोपर्यंत तपास पथक सर्व गोष्टी बघत नाहीत, तोपर्यंत त्याला या वादाळातून जावेच लागेल. तोपर्यंत त्याला या तपास पथकांवर विश्वास ठेवावा लागेल.'
- महेश म्हणाले, 'हृतिकने नेहमी स्टँड घेतला आहे. हीच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मला नाही वाटत, की एखाद्या व्यक्तीने हत्या केलेली असेल तर ती स्वत: सर्व पूरावे पब्लिक डोमेनमध्ये टाकेल. तो स्वत:ची कहाणी लोकांसमोर का मांडेल?'
पुढील स्लाईडवर वाचा,
कंगना-हृतिकमध्ये काय वाद आहे?
मुलांना घेऊन परदेशात गेली सुझान...
आतापर्यंत कंगनाचे कोणते ईमेल्स आले समोर....