Home »News» Kangana Plays A Gujarati Divorcee Who Lives Life On Her Own Terms

'सिमरन' चे ट्रेलर झाले रिलीज, चित्रपटात गुजराती घटस्फोटीत मुलीची आहे कंगनाची भूमिका

दिव्य मराठी वेब टीम | Aug 09, 2017, 10:43 AM IST

मुंबई - कंगना रनोटचा आगामी चित्रपट 'सिमरन'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. यात फॅन्सला तिचा अल्लड अंदाज पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर पाहताना कंगनाचा चित्रपट क्वीनची आठवण आल्यावाचून राहत नाही. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे अपूर्व असराणी निर्माता आहेत. 15 सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार आहे.
कंगनाला शेवटी 'रंगून' या चित्रपटात पाहण्यात आले होते. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. कंगना आगामी चित्रपट 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'सिमरन' चित्रपटाचे ट्रेलर..

Next Article

Recommended