आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut 13 Days Old Nephew First Birthday Celebration As Himachali Traditions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना रनोटच्या 13 दिवसांच्या भाच्याचे झाले घरी आगमन, गन्त्रालय पद्धतीने करण्यात आले वेलकम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अजय चंदेल आणि मुलगा पृथ्वीराजसोबत रंगोली - Divya Marathi
पती अजय चंदेल आणि मुलगा पृथ्वीराजसोबत रंगोली

मुंबईः अभिनेत्री कंगना रनोट 13 दिवसांपूर्वीच मावशी झाली आहे. तिची थोरली बहीण रंगोली चंदेलने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव पृथ्वीराज ठेवण्यात आले आहे. अलीकडेच कंगनाच्या होमटाऊनमध्ये पारंपरिक पद्धतीने पृथ्वीराजचे स्वागत करण्यात आले.


गन्त्रालय पद्धतीने झाले वेलकम...
- हिमाचल प्रदेशातील गन्त्रालय पद्धतीने कंगनाचा भाचा पृथ्वीराजचे स्वागत करण्यात आले.
- जेवण, संगीत आणि प्रार्थना करुन रनोट कुटुंबीयांनी नवजात बाळाचे स्वागत केले.
- रंगोलीने या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती पती आणि मुलासोबत पूजा करताना दिसतेय.
- कंगना सध्या मुंबईत असल्याने ती या फंक्शनमध्ये सहभागी होऊ शकली नाही. अलीकडेच 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर कंगना जखमी झाली असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे.


दिल्लीच्या बिझनेसमनसोबत झाले रंगोलीचे लग्न...
-  2011 मध्ये दिल्लीचे बिझनेसमन अजय चंदेलसोबत रंगोलीचे लग्न झाले.
- रंगोली कंगनाची मॅनेजरदेखील होती. तिचे सर्व प्रोफेशनल काम रंगोली सांभाळत असे.
- पण रंगोलीच्या प्रेग्नेंसीच्या काळात कंगनाने तिचे प्रोफेशनल काम सांभाळण्यासाठी एक टीम हायर केली.
- रंगोली अॅसिड विक्टिम आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. रंगोलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याच्या विचारात कंगना आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, या सेलिब्रेशनचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...