आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाला US मध्ये अपघात, हाताला-डोक्याला दुखापत; ड्रायव्हरच्या हातून निसटले होते स्टेअरिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनोट हिला अमेरिकेत अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या अपघातात तिच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खोकला आल्याने ड्रायव्हरच्या हातून कारचे स्टेअरिंग निसटले आणि हा अपघात घडला. या दुर्घटनेच्या वेळी कंगनासोबत आणखी काही जण गाडीत होते. बॉडीगार्डने केला बचावाचा प्रयत्न...

- हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, हा अपघात 12 ऑक्टोबरच्या रात्री घडला.
- कंगना जॉर्जियाची राजधानी अटलांटापासून काही अंतरावरील शूटिंग लोकेशनवरुन हॉटेलकडे परतत होती. तेथील एक स्थानिक ड्रायव्हर गाडी चालवत होता.
- गाडी चालवत असताना ड्रायव्हरला जोरात खोकला उसळला आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या कंगनाच्या बॉडीगार्डने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात कार स्टील फेसिंगला जाऊन थडकली.

कंगना शूर मुलगी
- वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार - दुर्घटनेच्या वेळी कारमध्ये उपस्थित सगळेच खूप घाबरले होते. मात्र सुदैवाने अपघातात कुणी गंभीर जखमी झाले नाही.
- कंगनाच्या डोक्याला आणि हाताला थोडी दुखापत झाली. घटनेनंतर काही मिनिटांतच तेथील स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. कंगनाने स्वतःला सावरत इतरांची चौकशी केली.
- घटनेनंतर कंगनाच्या सिनेमाच्या निर्मात्यांनी सगळ्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. या घटनेनंतर कंगनाने कामापासून ब्रेक घेतलेला नाही. ती दुस-याच दिवशी शूटिंग सेटवर हजर होती. निर्मात्यांनी तिला विश्रांती करण्याचाही सल्ला दिला.
- या घटनेनंतर कंगनाची प्रतिक्रिया आलेली नाही. सिनेमाच्या प्रॉडक्शन युनिटचे एक सदस्य शैलेष सिंह यांनी सांगितले, आम्ही या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलो आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अपघात भयंकर होता, मात्र सुदैवाने कुणालाही जास्त दुखापत झालेली नाही. कंगना शूर मुलगी आहे. अपघातानंतर थोडीही विश्रांती न घेता ती पुन्हा आपल्या कामावर रुजू झाली.
बातम्या आणखी आहेत...