आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा 'लक्ष्मीबाई' लुक रिलीज, बाहुबलीच्या लेखकाने लिहीली आहे कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी लक्ष्मीबाईच्या रुपात कंगना राणावत - Divya Marathi
राणी लक्ष्मीबाईच्या रुपात कंगना राणावत
मुंबई - अभिनेत्री कंगना राणावत आगामी चित्रपट 'मनिकर्निका' मध्ये राणी लक्ष्मीबाईच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटातील तिचा लुक कसा असणार, याचे एक स्केच समोर आले आहे. कंगनाचा लुक खरोखरच फार दमदार असणार, असेच या स्केचवरुन दिसत आहे.
 
विशेष म्हणजे बाहुबलीचे निर्माता एस. एस. राजामौली यांचे वडील के. वी. विजयेन्द्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहीली आहे. याअगोदर त्यांनी बाहुबली या रेकॉर्डतोड कमाई करणाऱ्या चित्रपटाची कथा लिहीलेली आहे. 
 
कंगना भूमिकेसाठी करतेय जीवतोड मेहनत...
 
'रंगून' चित्रपट जोरदार आदळल्यावर कंगना आता या प्रोजेक्टवर फार मेहनत घेत आहे. राणी लक्ष्मीबाईची भूमिका म्हटल्यावर तलवारबाजी आणि घोडेसवारी आलीच. यासाठी कंगना या कलांचे खास प्रशिक्षण घेत आहे.
 
कंगनाचा हा चित्रपट सर्वप्रथम केतन मेहता बनवत होते पण आता 'क्रिश' चे निर्माते राधा कृष्णा जगारलामुडी यांनी चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...