आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिकर्णिकाच्या शुटिंगदरम्यान कंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव, पडले 15 टाके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आगामी मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंग सेटवर कंगना रनोटबरोबर गंभीर अपघात झाला असून त्यात तिच्या कपाळावर 15  टाके पडले आहेत. अपघातानंतर कंगनाला लगेचच अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या कंगना आयसीसीयूमध्ये अॅडमिट आहे. तिला सुमारे आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुटिंगदरम्यान तलवारीचा घाव लागल्याने कंगना जखमी झाली आहे. 

हैदराबादमध्ये सध्या मणिकर्णिका चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यावेळी अॅक्टर निहार पांड्याबरोबर कंगना एका सीनचे शूट करत होती. यामध्ये निहार जेव्हा तलवार फिरवतो, तेव्हा कंगनाला खाली झुकायचे होते. पण कंगनाचे खाली झुकण्याचे टायमिंग चुकल्यामुळे तलवार कंगनाच्या भुवयांच्या मधोमध लागली. त्यात तिला गंभीर जखम झाल्याने लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आले. कंगना थोडक्यात बचावली असे डॉक्टरांनी सांगितले आहे. कारण घाव कंगणाच्या भुवयांच्या मध्ये आणि कपाळावर लागला. हाडाची दुखापत थोडक्यात टळली असे डॉक्टर म्हणाले. 

निर्माते कमल जैन यांनी सांगितले की, कंगनाला लगेचच 30 मिनिटांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिने हिम्मत दाखवली. निहार पांड्याला तलवार लागल्याने अपराधीपणाची भावना आली होती, पण कंगनानेच त्याला शांत केले. कंगनाने चित्रपटात बॉडी डबल न वापरता स्वतःच सर्व फाईट सीन करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर, शुटिंगदरम्यान कपाळावर व्रण तसेच राहू देणार कंगना..