आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'मणिकर्णिका'च्या सेटवरुन लीक झाला राणी लक्ष्मीबाईचा लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'सिमरन' या चित्रपटानंतर अभिनेत्री कंगना रनोट तिच्या आगामी 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या सेटवरुन कंगनाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा सेटवरुन कंगनाचे काही फोटोज समोर आले असून यात ती झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या गेटअपमध्ये दिसतेय. डोक्यावर पगडी आणि हातात तलवार घेतलेला कंगनाचा हा रॉयल लुक लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटाचे चित्रीकरण जयपूरमध्ये सुरु आहे. या चित्रपटासाठी कंगनाने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटातील फाइट सीन्स बॉडी डबलचा वापर न करता कंगनाने स्वतः केले आहेत. 'मणिकर्णिका...'चे दिग्दर्शक कृष हे असून के.वी. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात कंगनासोबत अंकिता लोखंडे, सोनू सूद आणि अतुल कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 27 एप्रिल 2018 रोजी रिलीज होतोय. 

पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटाच्या सेटवरील कंगनाचे आणखी 6 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...