आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्वीन'च्या सिक्वेलमध्ये झळकणार कंगना, स्क्रिप्टवर काम सुरु...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाच्या रिलीजच्या काळात कंगना रनोटने एका मुलाखतीत म्हटले होते, की एखाद्या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास ती आता इच्छूक नाही. ती म्हणाली, "सिक्वेलऐवजी फ्रेश सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे. मात्र या सिनेमात तनूचे पात्र नवीन आहे. त्याच जुन्या भूमिकेत तिला दाखवलेल नाही."
'तनू वेड्स मनू रिटर्न्स'च्या मिड लाइफमध्ये अडचणी आहेत. त्यामुळे आनंदजींना (सिनेमाचे दिग्दर्शक) या सिनेमासाठी मी होकार दिला. 'क्वीन'च्या सिक्वेलविषयी विचारणा झाली, तेव्हा कंगनाने सांगितले होते, "क्वीन खूप सुंदर सिनेमा आहे. त्या सिनेमाने अनेक ट्रेंड बदलले. मीसुद्धा या सिनेमाला आपला शेवटचा सिनेमा समजत होते. मात्र प्रेक्षकांना सिनेमा खूप पसंत पडला. विकास (दिग्दर्शक) यांनी माझ्याकडे सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कथेला न्याय मिळणार नाही, असे मी त्यांना म्हटले. जेथे क्वीनचा शेवट झाला, तेथून कथा पुढे सरकवणे आव्हानात्मक आहे. म्हणून विकास यांना क्वीन 2 साठी मी नाही म्हटले."
आता सूत्र सांगतात, "तनू वेड्स मनू रिटर्न्सच्या यशानंतर कंगनाचा विचार बदलला आहे. सिनेमाने रिलीजच्या तिस-या आठवड्यात 140 कोटींच्या घरात व्यवसाय केला. त्यामुळे कंगनाने क्वीन 2साठी होकार दिला आहे."
सिनेमाचे निर्माते फँटम फिल्म्सशी निगडीत सूत्र सांगतात, "विकास यांनी क्वीन 2च्या स्क्रिप्टवर काम सुरु केले आहे. स्क्रिप्ट दमदार असेल, तरच काम करेल असे कंगनाने विकासला सांगितले होते."