आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना बनणार मावशी, आई बनणार बहीण रंगोली; एकतर्फी प्रेमातून झाला होता अॅसिड हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल मीडियावर सध्या कंगना रनोटला प्रोटेक्ट करताना दिसणारी तिची मोठी बहीण रंगोली चंदेल सध्या प्रेग्नंट आहे. रंगोली सध्या तिच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहे. नुकताच तिने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रंगोली डार्क ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. फोटोत बेबी बंप फ्लॉन्ट करण्याबरोबरच ती पुस्तक वाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. रंगोली अॅसिड हल्लयाची पीडित आहे. तिच्यावर एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला झाला होता. कंगनानेही त्याचा उल्लेख अनेकवेळा केला आहे. 

म्युझिक लाँचमध्ये केला होता बहिणीच्या प्रेग्नंसीचा उल्लेख.. 
- काही दिवसांपूर्वी रंगोली कंगनाबरोबर तिच्या 'सिमरन' या अपकमिंग चित्रपटाच्या साँग लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली होती. 
- त्याठिकाणी तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कंगनाने याला प्रेस कॉन्फरन्समध्ये दुजोराही दिला होता. 
- रिपोर्ट्सनुसार नोव्हेंबर 2017 मध्ये कंगना मावशी बनू शकते.  

दिल्लीच्या बिझनेसमनबरोबर केले लग्न 
- रंगोलीने 2011 मध्ये दिल्लीचा बिझनेसमन अजय चंदेलबरोबर लग्न केले होते. 
- रंगोली ही कंगनाची मॅनेजरही आहे. ती तिचे सर्व व्यावसायिक काम पाहत होती. 
- आता कंगनाने तिच्या कामासाठी एक टीम हायर केली आहे. बहिणीला खासगी आयुष्यात लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी कंगनाने हा निर्णय घेतला. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कंगनाही बहीण रंगोलीचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...