आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 PHOTO: कंगना रनोटने आरती केल्यानंतर गंगेत अशी घेतली डुबकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - कंगना रनोटने गुरुवारी वाराणसीमध्ये तिचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' चे पोस्टर लाँच केले. त्यानंतर सायंकाळी तिने राणी लक्ष्मीबाईच्या वेशभुषेत सुमारे 15 मिनट गंगेची पुजा केली. त्यानंतर ती संपूर्ण युनिटबरोबर गंगाआरतीमध्ये सहभागीही झाली. त्यानंतर तिने गंगा स्नान केले. 

काय म्हणाली कंगना.. 
- आरतीच्यावेळी उपस्थित असलेल्यांनी गंगेत स्नान करणे शुभ असते असे सांगतात, आरती संपल्यानंतर कंगना थेट नदी स्नानासाठी गेली आणि तिने चार वेळा गंगेत डुबकी घेतली. 
- त्यानंतर कंगना म्हणाली, 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा चित्रपट आहे. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. राणी लक्ष्मीबाईचे पात्र एक मुलगी, पत्नी, आई आणि स्वातंत्र्याचा लढा लढणारी वीरांगणा अशा विविध रुपांत साकारायचे आहे. हे कठीण काम असल्याचे कंगना म्हणाली. 
- घोडेस्वारी शिकत असून तलवारबाजीही लवकरच शिकणार असल्याचे कंगना म्हणाली. 1828 च्या काळानुसारा कॉस्च्युम तयार करण्यात आल्याचे कंगनाने सांगितले. बनारस, झाशी, ग्वाल्हेरसह अनेक ठिकाणी चित्रपटाचे शुटिंग होणार आहे. 
- यादरम्यान, कंगनाबरोबर संगीतकार शंकर एहसान लॉय, बाहुबली चित्रपटाचे रायटर विजेंद्र प्रसाद, गीतकार प्रसून जोशी यांचीही उपस्थिती होती. 

राणी लक्ष्मीबाईवरील बायोपिक आहे 'मणिकर्णिका'
- कंगना या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका करत आहे. चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. 
- पोस्टर लाँचिंगपूर्वी कंगना पूर्णटीमबरोबर बोटद्वारे घाटावर पोहोचली. याठिकाणी सर्वांनी फोटोही काढले. अनेक ठिकाणी कंगना मोबाईलमध्ये बिजी असल्याचे पाहायला मिळाले. 
- आतापर्यंत केवळ कंगनाच्या गेटअपचे स्केच समोर आले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कंगनाच्या गंगास्नानाचे आणि आरती दरम्यानचे इतर काही फोटो..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...