आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या \'माय चॉइस\'नंतर आता समोर आला कंगना राणावतचा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दीपिका पदुकोणच्या 'माय चॉइस' व्हिडिओनंतर आता कंगनाचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणींच्या जागृकतेविषयी भाष्य करण्यात आले आहे. संपूर्ण व्हिडिओ 14 वर्षाच्या एका तरुणीवर चित्रीत करण्यात आला आहे. तिचे फॅशन डिझाइनर होण्याचे स्वप्न असते, परंतु पालकांची इच्छा असते, की तिने इंजिनिअर बनावे.
अखेर कंगना राणावत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून त्या तरुणीला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसते. कंगना तिच्या प्रयत्नात यशस्वी ठरते.
कंगनाच्या समजावण्याचा सीन पाहिल्यास राजकुमार हिराणी यांच्या '3 इडियट्स'मधील रँचो (आमिर खान) फरहान (आर माधवन)च्या वडिलांना समजावतानाचा सीन लक्षात येतो. फरहानला वाइल्ड लाइफ फोटोग्राफर व्हायचे असते आणि त्याचे पालक त्याला नकार देऊन इंजिनिअरिंगला पाठवतात.
रंगनाच्या व्हिडिओपूर्वी दीपिका पदुकोणचा 'माय चॉइस' रिलीज झाला होता. त्यामध्ये महिला सबलीकरणावर भाष्य केले होते. या व्हिडिओला काही लोकांनी पसंत केले तर काहींची टिकेची झोड उडवली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या व्हिडिओशी संबंधित फोटो...