आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकने पाठवली अब्रूनुकसानीची नोटिस, कंगनाने लावला धमकावल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फराह खानच्या शोमध्ये कंगना रनोट आणि हृतिक रोशन - Divya Marathi
फराह खानच्या शोमध्ये कंगना रनोट आणि हृतिक रोशन
मुंबई: कंगना रनोट आणि हृतिक रोशन पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. अलीकडेच एक वृत्त समोर आले होते, की हृतिकने त्याचा वकील दीपेश मेहताकडून कंगनाला अब्रूनुकसानीची नोटिस पाठवली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, आता कंगनाने या नोटिसला उत्तर देत हृतिकला 21 पानांची नोटिस पाठवली आहे. त्यात तिने हृतिकवर धमकी दिल्याला आरोप लावला आहे.
नोटिसमध्ये काय लिहिले कंगनाने?
- कंगनाने नोटिसमध्ये लिहिले आहे, की तिने कधीच कुणाचे नाव घेतले नाही. म्हणून ती कुणाच्या अब्रूनुकसानीसाठी दोषी ठरू शकत नाही.
- कंगनाने हृतिकला पाच दिवसांचा वेळ देऊन उत्तर मागितले आहे. मात्र, अद्याप हृतिकने काहीच उत्तर दिलेले नाहीये.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
- यावर्षी जानेवारीच्या अखेर एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले होते, की तिने हृतिकमुळे 'आशिकी 3' सोडला?
- कंगनाने उत्तरात सांगितले, 'हो मीसुध्दा अशा अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहित सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे कृत्य का करतात. माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. मला त्यांची पुनरावृत्ती करायची नाहीये.'
- तिच्या या वक्तव्यावर हृतिकने टि्वट केले होते, 'जितक्या महिलांसोबत मीडियाने माझे नाव जोडले आहेत, त्यापेक्षा जास्त चान्स माझा पोप डेनसोबत आहे.'- आता हृतिकने कंगनाच्या या वक्तव्यासाठी नोटिस पाठवली आहे.
हृतिक-सुझानचे नाते तुटण्यामागे कंगना आहे का?
- हृतिक आणि सुझान विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी कंगनालासुध्दा या विभक्तासाठी जबाबदार मानले गेले होते.
- कंगना आणि हृतिकने 'काइट्स' आणि 'क्रिश 3'सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाण आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगना आणि हृतिकचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...