आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाने हृतिकला दिले सडेतोड उत्तर, \'पब्लिसिटीसाठी मला तुझी गरज नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक आणि कंगना (फाइल फोटो). दोघांनी आपसातील वादानंतर पब्लिक स्टेटमेंट सादर केले आहे. - Divya Marathi
हृतिक आणि कंगना (फाइल फोटो). दोघांनी आपसातील वादानंतर पब्लिक स्टेटमेंट सादर केले आहे.
मुंबई- कंगना रनोट आणि हृतिक रोशन यांनी कायदेशीर वादानंतर पब्लिक स्टेटमेंट सादर केले आहे. कंगनाकडून सादर केलेल्या स्टेटमेंट म्हटले आहे, की हृतिकचा हेतू फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा होता. कंगनाने असेही सांगितले, की तिला प्रसिद्धी मिळवण्यासाठी हृतिकची गरज नाहीये. दुसरीकडे, हृतिकने म्हणाला, की कोणतीच व्यक्ती एका मर्यादेपर्यंत शांत राहू शकते.
परंतु, जर ही केस कंगना जिंकली तर हृतिकला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. कलम 67 अन्वये अश्‍लील गोष्टींचं प्रसारण (विशेषत: सोशल मीडियाबाबत) 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. दुस-या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याशिवाय मानहानीच्या आरोपा अंतर्गत हृतिकला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही होण्याची शक्यता आहे. एका महिलेची अब्रूनुकसानी केल्याबद्दल सात वर्षांची कैद आणि दंडही होऊ शकतो.
कंगनाने वकिलांमार्फत सादर केले स्टेटमेंट, कोणत्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या...
- हृतिकचे पब्लिक स्टेटमेंट केवळ लोकांचे सांत्वन मिळवण्याचा प्रयत्न होता.
- धमकी दिल्यानंतर आता तो या प्रकरणात वाचू शकणार नाही.
- कंगना त्याला कधीच ‘सिली एक्स’ म्हणाली नाही. या शब्दाचा वापर स्वत: हृतिकने कंगनाला पाठवलेल्या कायदेशीर नोटिसमध्ये केला होता.
- हृतिक स्वत: मीडियाला मसाला देतोय. त्यासाठी कंगनाला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही.
- हृतिकने चुकीचे आरोप लावले आहेत. तो म्हणाला, की कंगनाला सोशिअली ओळखत नाही.
- जर हृतिकच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर, त्याने सांगावे, की तो का कंगनाच्या बर्थडे पार्टीत संपूर्ण कुटुंबीयासोबत जात होता. कंगनासुध्दा हृतिकची बहीण आणि वडिलांच्या बर्थडे पार्टीत गेली होती.
- या सर्व गोष्टी जगजाहिर आहेत, त्यामुळे हृतिक खोट बोलतोय हे स्पष्ट होते.
आणखी काय म्हटले आहे कंगनाच्या स्टेटमेंटमध्ये?
- हृतिकने कंगनाला पाठवलेल्या नोटिसमध्ये आरोप लावला होता, की ती पोलिसांच्या चौकशीत मदत करत नाहीये. परंतु हे आरोपसुध्दा खोटे आहेत.
- प्रश्न असा आहे, की हृतिक खरा होता तर त्याने नोटिस पाठवायला सात महिन्यांचा वेळ का घेतला. आम्हाला कोणत्या एजेन्सीच्या चौकशीत सामील होण्यासाठी सांगण्यात आलेच नाही.
- सत्य असे आहे, की हृतिकला नोटिस पाठवल्यानंतर आता तो स्वत:चा बचाव करतोय.
- हृ़तिक म्हणाला, की कंगनाने त्याला 24 मे 2014पासून 16 फेब्रुवारी 2016पर्यंत दररोज 50 ई-मेल्स पाठवले. तो स्वत: असेही म्हणतोय, की त्याला एकूण 1439 ई-मेल्स मिळाले. हेसुध्दा खोटे आहे. जर 50 ई-मेल्स दररोज पाठवले असते तर ई-मेल्सची संख्या 30 हजार झाली असती.
- कंगनाने ई-मेल्स पाठवले हे मान्य केले आणि हृतिकला तिला थांबवायचे होते, तर त्याने तिला ब्लॉक का केले नाही?
हृतिकच्या स्टेटमेंटमध्ये कंगनाचे नाव नाही, परंतु आरोप काय?
- हृतिकनेनेसुध्दा आपल्या प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट सादर केले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कुठेच कंगनाचे नाव घेण्यात आलेले नाहीये.
- हृतिकने म्हणाला, की एक फेक ई-मेल आईडीच्या माध्यमातून त्याला कुणीतरी त्रास देत आहे. ही एक मेंटल हेल्थशी निगडीत घटना आहे आणि दोन वर्षे यामुळे शांत राहिला.
- स्टेटमेंटनुसार, 'खासगी गोष्टी जेव्हा सार्वजनिक केल्या जातात, तेव्हा वाद निर्माण होतो. याचे कारण आहे, लोकांना सत्याविषयी संपूर्ण माहिती नसणे.'
- 'मी खासगी गोष्टी खासगी ठेवण्यासाठी कायदेशीर नोटिसचा आधार घेतला होता. परंतु हेसुध्दा लोकांना सांगितल्या गेले.'
- एका मर्यादेपर्यंत शांत राहिल्या जाऊ शकते. परंतु हे मौन फॅमिली आणि स्वत:च्या प्रतिमेसाठी एक ना एक दिवस तोडावेच लागते.
- एक सत्य असेही आहे, की ई-मेल आईडी (hroshan@email.com)माझा नाहीये. याविषयी दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले आहे.
- क्राइम ब्रांच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्या दिवशी हा आईडी हँडल करणा-या व्यक्तीचा शोध लागेल, त्यादिवशी सर्वकाही संपेल.
- मेंटल हेल्थ एक मोठी समस्या आहे. मी कधीच पर्सनली अटॅक केला नाहीये. तरीदेखील कुणी असे समजत असेल तर फक्त एवढेच म्हटले जाऊ शकते, की त्या व्यक्तीने माझे म्हणणे चुकीच्या पध्दतीने घेतले.
- मला वाटते, या प्रकरणात मी दोन वर्षांपासून जसा शांत होतो तसेच राहावे.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
- यावर्षी जानेवारीच्या अखेर एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले होते, की तिने हृतिक मुळे 'आशिकी 3' सोडला?
- कंगनाने उत्तरात सांगितले, 'हो मीसुध्दा अशा अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहित सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे कृत्य का करतात. माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. मला त्यांची पुनरावृत्ती करायची नाहीये.'
- तिच्या या वक्तव्यावर हृतिकने टि्वट केले होते, 'जितक्या महिलांसोबत मीडियाने माझे नाव जोडले आहेत, त्यापेक्षा जास्त चान्स माझा पोप डेनसोबत आहे.' - आता हृतिकने कंगनाच्या या वक्तव्यासाठी नोटिस पाठवली आहे.
- हृतिकने त्याचा वकील दीपेश मेहताकडून कंगनाला अब्रूनुकसानीची नोटिस पाठवली.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, कंगनाने या नोटिसला उत्तर देत हृतिकला 21 पानांची नोटिस पाठवली. त्यात तिने हृतिकवर धमकी दिल्याला आरोप लावला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कंगना-हृतिकने 2014मध्ये केला होता साखरपुडा....
बातम्या आणखी आहेत...