आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य पांचोलीचा बचाव करणाऱ्या झरीनावर भडकली कंगनाची बहीण, पाहा काय म्हणाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंगना रनोट सध्या तिच्या पास्ट रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या आगामी 'सिमरन' चित्रपटाच्या दरम्यानही ती आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन यांच्यावर हल्ला करायला मागेपुढे पाहत नसल्याचे दिसते आहे. एवढेच नाही तर कंगनाने आदित्यची पत्नी झरीना वहाबला चांगलेच सुनावले आहे. मात्र यादरम्यान कंगनाने बहीण रंगोली चंदेलनेही झरीना वहाबवर हल्ला चढवला आहे. 

काय म्हणाली कंगनाची बहीण.. 
- कंगनाची बहीण रंगोली चंदेलने एकापाठोपाठ एक ट्वीट करत म्हटले, जर कंगना आदित्य पांचोलीला 2005 मध्ये भेटली आणि वर्सोवा पोलिस ठाण्यात 2007 मध्ये एफआयआर दाखल केली तर दोघांनी 4 वर्षे एकमेकांना डेट कसे केले, जरीना जी. 
- सना पांचोलीचा जन्म 1985 मध्ये झाला तर कंगनाचा 1987 मध्ये. जर तुम्हीही या अत्याचारात सहभागी असाल तर तुम्हाला लाज वाटायला हवी. कारण ती तुमच्या मुलीपेक्षा छोटी आहे. 
- तुम्ही दोघे (आदित्य आणि झरीना) जेलमध्ये असायला हवे. तुमच्या पतीने एका अल्पवयीन मुलीचे शोषण केले आहे, हे तुम्हाला माहिती होते, तर मग तिला गिफ्ट देऊन दोन मोठ्या डायरेक्टर्सची भेट का घालून दिली. 
- तुम्ही कंगनाला डायमंड्स आणि कपडे बँकॉकहून गिफ्ट करून तिला पोलिसांत तक्रार करू नको अशी विनंती का केली. 
- त्यानंतर पोलिसांत जाऊ नको असे सांगत तुम्ही तिला नेहमी फिश बिर्याणी पाठवत होत्या. काय झरीना जी उत्तर द्या. 

पुढे वाचा, यापूर्वी झरीना वहाने काय म्हटले होते.. 
 
बातम्या आणखी आहेत...