आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एक्स\' बॉयफ्रेंडवर भडकली कंगना, म्हटली \'मी एका मुर्खाला डेट केले\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बोल्ड आणि बिनधास्त असणाऱ्या कंगनाने नुकतेच एका टीव्ही शोमध्ये अभिनेता हृतिक रोशन, आदित्य पांचोली, करण जोहर यांसारख्या चित्रपटक्षेत्रातील मोठ्या नावांवर ताशेरे ओढले आहेत. कंगनाने सांगितले की,  हृतिक रोशनने एका डॉक्टरला माझी मदत करण्यासाठी सांगितले होते कारण त्याला वाटत होते की, मला कुठलातरी मानसिक आजार आहे. त्याला मला पागल ठरवायचे होते तसेच मला तुरुंगातही पाठवायचे होते. मी एक ओपन लेटर ‘Speak up or Shut up' लिहीले होते पण कोणत्याच पब्लिकेशनने ते छापण्यास उत्सुक्ता दाखविली नाही. त्यांनी राकेश रोशन त्यांचे मित्र असल्याचे सांगत ते छापण्यास नकार दिला. मी एका मुर्ख व्यक्तीला डेट केले होते जो मला कधीही फसवु शकत होता पहिले मला हॉतिकची माफी हवी होती पण आता मला हा विषय संपवायचा आहे. या केसमध्ये हृतिक त्यांच्या वडिलांच्या पैशांचा वापर करत आहे. मी राकेश रोशन यांना सांगितले की तुम्ही सर्वांनी माझे जीवन नरक करुन ठेवले आहे आणि जर मी हृतिकच्या जागी असती तरलत्याबद्दल माफीही मागितली असती. 

यासोबतच कंगनाने सांगितले की, "जर मी एक दिवस जरी हृतिक रोशन असती तर त्याची माफी मागितली असती. माझ्या अनेक चिठ्ठ्या त्याने जगजाहिर केल्या आणि एक अफेअर लपवण्यासाठी त्याने अनेक चुका केल्या आहेत. अभिनेता आदित्य पांचोलीविरुद्धही कंगनाने केले खुलासे..

हृतिकनंतर कंगनाने आदित्य पांचोलीविरुध्दही अनेक गोष्टी सांगितल्या. कंगनाने एका मुलाखतीत सांगितले की, आदित्य पांचोलीने मला घर, गाडी आणि ड्रायव्हरही दिला होता. त्याने मला अनेक गिफ्टही पाठवले. लोक जेव्हा तुमचे शोषण करतात तेव्हा ते सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांपासून वेगळे करतात. मी आदित्य पांचोलीच्या पत्नीकडेही मदत मागितली. मी शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरासमोरील फुटपाथवर पडून होती. तेथील गार्ड्सने मला ओळखले होते. तेव्हा मी बेघर झाले होते."
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, शो 'आपकी अदालत' मध्ये कंगनाने केले मोठे खुलासे..
बातम्या आणखी आहेत...