आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: ज्या फिल्मसाठी बनवले 8 पॅक अॅब्स, त्यातील स्टंटनेच घेतला या अॅक्टरचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळूरुः सोमवारी बंगळुरुच्या पश्चिम भागातील मागदी रोडवर असलेल्या तिप्पागोंदानहल्ली तलावात ‘मस्ती गुडी’ या कन्नड सिनेमाच्या शूटिंगवेळी दोन अभिनेत्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या अभिनेत्यांची नावे अनिल कुमार आणि उदय अशी आहेत. रिपोर्टनुसार, या सिनेमात अनिल कुमारची व्यक्तिरेखा ही खलनायकाची होती. या सिनेमातील स्टंटसाठी त्याने खास ट्रेनिंगसुद्धा घेतले होती. सिनेमासाठी त्याने 8 पॅक अॅब्स बनवले होते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कुमारने सांगितले होते, की अभिनेता विजयसोबत स्ट्राँग निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी तो
एक्साइटेड आहे. सिनेमात व्हिलनच्या रुपात मिळाली होती ओळख...

अनिलने कन्नडमधील जवळजवळ 25 सिनेमांमध्ये काम केले आहे. विशेषतः तो निगेटिव्ह भूमिकांमध्येच अधिक दिसला. 'मस्तीगुडी' या सिनेमासाठी त्याने एक खास फोटोशूट केले होते. यामध्ये तो 8 पॅक अॅब्समध्ये दिसला होता. अनिल कुमारचे हे शेवटचे फोटोशूट तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...