आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा सिंधूचे अपघाती निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा सिंधूचा कार अपघातात मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू तिच्या तीन मित्रांसोबत कारमध्ये असताना हा अपघात झाला असून, त्या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. वेल्लोर तालुक्यातील पेरनांबुत जवळील सुन्नामपुकुत्ताई गावात हा अपघात झाला. चेन्नईकडून बंगळुरुकडे जाताना झालेल्या या भीषण अपघातामध्ये त्या कारचे पूर्णपणे नुकसान झाले असून, कारमध्ये असलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. 
 
रेखा सिंधूशिवाय या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावे अभिषेक कुमारन (22), जयंकंद्रन (23) आणि रक्षण (20) अशी असून, त्यांचे मृतदेह तिरूपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...