आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून हसून लोटपोट करणारा आहे कपिल शर्माच्या डेब्यू फिल्म 'किस किसको...'चा TRAILER

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करुं' या पहिल्यावहिल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये कपिल, एक दोन नव्हे तर तब्बल चार तारकांसोबत रोमान्स करताना दिसतोय. ट्रेलरमध्ये त्याचे तीनदा लग्न झालेले दाखवले आहे. त्याच्या तीन पत्नी आणि एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे.
3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कपिलची डायलॉगबाजी आणि कॉमेडी टायमिंग मजेशीर आहे. या कॉमेडी सिनेमात कपिलसोबत मंजरी फडनिस, सिमरन कौर, एली अवराम, सई लोकूर, वरुण शर्मा आणि अरबाज खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
25 सप्टेंबर रोजी रिलीज होणा-या या सिनेमाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान या जोडीने केले आहे. व्हिनस रेकॉर्ड्स, टॅप्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अब्बास मस्तान प्रॉडक्शनमध्ये या सिनेमाची निर्मिती झाली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, या सिनेमाच्या ट्रेलरची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...