Home »News» Kapil Sharma Exclusive Interview

कपिल म्हणाला- ‘दारूचा आधार घेताच वाईट काळ सुरू, ब्लँकेटमध्ये तोंड लपवून रात्री जागून काढल्या’

किरन जैन | Nov 13, 2017, 12:12 PM IST

  • कपिल शर्मा.
मुंबई- टीव्ही आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि काॅमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या तो आपला आगामी चित्रपट ‘फिरंगी’ला प्रमोट करण्यामध्ये व्यग्र आहे. त्याच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान चित्रपटासोबतच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबतही खुलासा केला.

प्रश्न: आपल्या सहकलाकारांसोबत मारहाण करणे, स्वत:च्या शोला येणे इत्यादी वादग्रस्त गोष्टींचा हिस्सा झाला आहेस...
उत्तर: माणूस टेंशनमध्ये असतो तेव्हा त्याच्याकडे विचार करण्याची ताकद राहत नाही. २०१६ च्या नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत मी खूप तणावामध्ये होतो. माझ्या चित्रपटाची आणि शोची शूटिंग एकाचवेळी सुरू होती. त्यामुळे मी खूप टेंशनमध्ये होतो. हा तणाव दूर करण्याऐवजी मी दारूचा आधार घेतला आणि तेथूनच माझा खराब काळ सुरू झाला. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतत असताना माझे सहकलाकारासोबत भांडण झाले. मी इव्हेंट ऑर्गनायझरचे पैसे परत करण्यासही तयार होतो, परंतु माझे नशीबच खराब होते. असो, मी नेहमीच आपल्या चुका मान्य केल्या आहेत आणि त्यात सुधारण्याचा प्रयत्नदेखील करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, इतरांना हसवणारा स्वतःच्या आयुष्यात कसा आहे...

Next Article

Recommended