आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर यांनी केले विदेशी तरुणीसोबत लग्न, या आहेत कपूर परिवारातील सूना PHOTOSr

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीराज कपूर आणि रामसरनी. - Divya Marathi
पृथ्वीराज कपूर आणि रामसरनी.

ज्येष्ठ अभिनेते शशि कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (4 डिसेंबर) सायंकाळी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आता रणबीर पर्यंत  कपूर परिवारातील सर्वांनाच लोक ओळखतात. मात्र त्यातही काही असे चेहेरे आहेत, जे सहसा सर्वांसमोर आले नाहीत आणि ज्यांना फार कमी लोक ओळखतात. शशि कपूर यांनी वयाच्या 20व्या वर्षी जेनिफर यांच्या सोबत लग्न केले होते.  

 

पृथ्वीराज कपूर यांना होती चार मुले..
- पृथ्वीराज कपूर भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारे कपूर परिवारातील पहिले सदस्य होते. पृथ्वीराज यांनी 1929 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. 
- पृथ्वीराज यांनी 1923 मध्ये रामसरनी मेहरा यांच्यासोबत विवाह केला होता. पृथ्वीराज-रामा यांना चार मुले झाली त्यात राज, शम्मी, शशि आणि मुलगी उर्मी होती. 
- पृथ्वीराज कपूर यांनी 'दो धारी तलवार' (1928), 'सिनेमा गर्ल (1929), 'आलम आरा' (1931), 'सीता' (1934), 'मिलाप' (1937), 'दुश्मन' (1939), 'चिंगारी' (1940), 'मुगल-ए-आजम' (1960) सह अनेक चित्रपटांत काम केले होते. पृथ्वीराज कपूर यांचे 29 मे 1972 ला निधन झाले. त्याच वर्षी जूनमध्ये त्यांची पत्नी रामसरनी यांचे निधन झाले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कपूर परिवारातील सूना...

बातम्या आणखी आहेत...