आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversy: अडकला बिगबी आणि करण जोहरचा Biopic, कसा जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडमध्ये आत्मचरित्रपर सिनेमे बनवण्याची सध्या निर्माते-दिग्दर्शकांमध्ये चढाओढ लागलीय. मेरीकॉम आणि मिल्खा सिंगवर चित्रपट बनला. तो यशस्वी झाला. आणि करण जोहरने लगेच हॉकीपटू ध्यानचंद ह्यांच्यावर चित्रपट बनवण्याची उत्सुकता दाखवली. तर पाठोपाठ बिग बीसुध्दा त्यांचे कोणे एकेकाळचे मित्र मुलायमसिंग ह्यांच्यावर एक आत्मचरित्र बनवत असल्याची बातमी आली. पण आता ही दोन्ही बायोपिक बारगळल्याचेच चित्र आहे.
नुकतीच करण जोहरने शाहरूख खान-आलिया भट स्टारर एक चित्रपट अनाउन्स केला. ह्यामुळे शाहरूख-आलियाचे चाहते जरी खूश झाले, तरी सध्या ध्यानचंद ह्यांचा मुलगा अशोककुमार फारच अस्वस्थ झाला असल्याचे कळतेय. एका दैनिकाला त्याने दिलेल्या मुलाखतीत आपली अस्वस्थता तो लपवू शकलेला नाही.
अशोककुमार म्हणतो, “तीन वर्षांपूर्वी मला माझ्या वडिलांच्यावर चित्रपट बनवण्याची परवानगी घेण्यासाठी विचारणा करण्यात आली. त्यानंतर पूढे काहीच झालं नाही. त्या चित्रपटावर लवकरात लवकर काम सुरू व्हावं अशी माझी इच्छा आहे.”
विशेष म्हणजे ध्यानचंद ह्यांच्यासोबतच्या चित्रपटासाठी निर्मात्या पुजा आणि आरती शेट्टी ह्यांच्यासोबत आपण सिनेमा बनवणार असल्याचेही करणने गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिर केले होते. ह्याच महिन्याच्या २९ तारखेला ध्यानचंद ह्यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे आता अशोककुमार आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला तरी चित्रपटाबाबत काही बोलणी सुरू व्हावीत, ह्यासाठी करणची भेट घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळते आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय झालं बिग बींच्या बॉयोपिकचे ?