आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: एकेकाळी ट्विंकलच्या प्रेमात वेडा झाला होता करण, \'गे\' असल्याचा स्वतः केला आहे खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि कॉश्च्युम डिझायनर करण जोहर 45 वर्षांचा झाला आहे. अत्यंत कमी वयात बॉलिवूडमधील दिग्गज व यशस्वी दिग्दर्शकांच्या मांदियाळीत स्थान मिळवलेल्या करणचा जन्म 25 मे 1972 रोजी निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांच्या घरी झाला. करणसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास आहे. त्याचे कारण म्हणजे करण अलीकडेच बाबा झाला आहे. यश आणि रुही ही त्यांच्या जुळ्या बाळांची नावे आहेत. त्याच्या या बाळांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. 
 
'गे' असल्याचा स्वतः केला खुलासा
करण जोहरचे अलीकडेच 'दी अनसुटेबल बॉय' या नावाने आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये त्याने  त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. पुरुषांसारखाच नॉर्मल आहे की 'गे' (GAY) आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले. तो म्हणाला होता, 'माझा लैंगिक कल नेमका कुठल्या बाजूनं आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. ते 'तीन' शब्द जगाला ओरडून सांगण्याची मला गरज नाही आणि ते जाहीर करून मला जेलमध्ये जायचं नाही.' 
 
एकेकाळी ट्विंकल खन्नाच्या प्रेमात झाला होता वेडा...
ऑगस्ट 2015 मध्ये ट्विंकल खन्नाच्या मिसेस फनीबोन्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करणने कबुली दिली होती, की तो एकेकाळी ट्विंकलच्या प्रेमात आकंठ बुडाले होता. त्यावेळी दोघेही बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिकत होते. यावेळी करणने सांगितले होते, की ट्विंकलने त्याच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला राणी मुखर्जीला सिनेमात कास्ट करावे लागले होते.

झाला FAT to FIT
करण जोहरने काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर स्वतःचे एक छायाचित्र पोस्ट केले होते. या छायाचित्रात तो खूप लठ्ठ दिसत होते. त्यावेळी त्याचे तब्बल 120 किलो वजन होते. मात्र व्यायाम आणि योग्य आहारामुळे आपण वजन कमी केल्याचे त्याने सांगितले होते. आज बॉलिवूडचा स्टायलिश मॅन म्हणून त्याला ओळखले जाते. 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, करण जोहरच्या आयुष्यातील आणखी काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स... आणि बघा त्याचे Unseen Photos 
बातम्या आणखी आहेत...