आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटप्पाने बाहुबलीला का मारले? 14 एप्रिल 2017 नव्हे या तारखेला होणार खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2017 ला रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 28 एप्रिल 2017 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. एसएस राजामौलीच्या डायरेक्शनमध्ये तयार करण्यात आलेल्या 'बाहुबली : द कन्क्लूजन' बाबत निर्माता करन जोहर यानेच ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. चित्रपटाचा पहिला पार्ट जुलैला रिलीज झाला होता. त्याने 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

वर्षाअखेरीस पूर्ण होणार शुटिंग
- 'बाहुबली : द बिगिनिंग' च्या सिक्वलची सध्या शुटिंग सुरू आहे.
- या वर्षी जुलै महिन्यात शुटिंग पूर्ण होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता त्याला उशीर होणार असे दिसत आहे.
- त्यानंतर VFX (विजुअल्स इफेक्ट्स) च्या कामालाही बराच वेळ लागेल.

पुढे पाहा, करन जोहरने केलेले ट्विट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...