आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाबा' झाल्यानंतर किती बदलले आयुष्य, करण जोहरने शेअर केले Experience

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई. 25 मे रोजी दिग्दर्शक करण जोहरने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात करण जुळ्या मुलांचा वडील झाला. रुही आणि यश ही त्याच्या जुळ्या बाळांची नावे आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com ने करणला त्याच्या आयुष्यात मुलांची एन्ट्री झाल्यानंतर काय बदल घडले, याच्याविषयी चर्चा केली. काय म्हणाला करण जाणून घ्या..
 
Q. मुलांच्या संगोपनाचा अनुभव कसा आहे?
A. "हा अनुभव माझ्यासाठी कुछ कुछ होता है(1998) या सिनेमाच्या प्रीमिअरसारखा आहे.  माझ्या पहिल्या सिनेमाशी निगडीत प्रत्येक क्षण मला आठवतोय. ज्या दिवशी मी दोघांना घरी घेऊन आलो तो K3G क्षण होता. माझी आई दारावर तशीच उभी होती, जशा जया आंटी सिनेमात पुजेचे ताट हातात घेऊन आपल्या सूनेचे वेलकम करतात. माझ्या आईने येथे सूनेचे नव्हे तर नातवंडांचे वेलकम केले. माझ्या सर्व आंटी तिच्या मागे उभ्या होत्या. मी माझ्या मुलांना घेऊन त्या रुममध्ये गेलो, जेथे माझ्या वडिलांचा  फोटो लावला आहे. हे सर्व सिनेमांच्या सीन्ससारखे होते. हे सर्व माझ्यासोबत खासगी आयुष्यात घडत होतं. माझ्यासाठी प्रत्येक क्षण खूप स्पेशल होता."
 
Q. मुलांच्या आगमनानंतर आयुष्यात किती बदल झाला?
A. "माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल आला आहे. वयाच्या 45 व्या वर्षी हे माझ्यासाठी ब्लॉकबस्टर सारखे आहे. जेव्हा ते झोपतात, मस्ती करतात, मी त्यांना बघत असतो. ही मुले माझी आहेत, यावर क्षणभर माझा विश्वास बसत नाही. जेव्हा मी त्यांना बघत असतो, तेव्हा आपोआप माझे डोळे पाणावतात. अनेकदा रात्रीतून मी दचकून उठतो, कारण माझे अर्धे आयुष्य दुस-या खोलीत श्वास घेत आहे, असा विचार माझ्या मनात डोकावत असतो."
 
Q. तुमच्या प्रोजेक्ट्स, ट्रॅव्हल आणि सोशल कमिटमेंट्सविषयी सांगा..
A. "जेव्हा रुही आणि यशचा जन्म झाला, तेव्हा माझ्याजवळ बरेच प्रोजेक्ट्स आणि सोशल वर्क होतं. पण मी सध्या कामाला बॅक सीटवर ठेवले आहे. कारण मुलांची काळजी घेणे आणि त्यांचे लाड करणे, यावर माझा सध्या भर आहे. ते थोडे मोठे झाल्यानंतर, मी त्यांना ऑफिसला सोबत घेऊन जाणार आहे. दोघेही धर्मा प्रॉडक्शनचे प्रॉडक्शन आहे. मी प्रवासतही त्यांना सोबत घेऊन जाणार आहे."

पुढे वाचा, आपल्या दोन्ही मुलांविषयी आणखी काय सांगितले करणने....  
बातम्या आणखी आहेत...