आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRK म्हणाला- जो 25 लाख देईल त्याला सपोर्ट करणारच, अजयने रिलीज केले रेकॉर्डिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर सक्रीय कमाल राशिद खान (केआरके) चे एक कॉल रेकॉर्डिंग गुरुवारी उघड केले . अजयची अपकमिंग मुव्ही 'शिवाय'चा प्रोड्यूसर कुमार मंगत आणि केआरके यांच्यातील बातचीत अजयने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. यात केआरके म्हणतो, की तो करण जोहर प्रोडक्शनची फिल्म 'ऐ दिल है मुश्कील' बद्दल काहीही वाईट बोलणार नाही. ज्या व्यक्तीने 25 लाख रुपये दिले असतील त्याला फेव्हर तर करावेच लागेल. फोन रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर केआरके म्हणाला, की त्याने कोणतेही पैसे घेतलेले नाही.

कसा सुरु झाला वाद
- अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसचा शिवाय आणि करण जोहरचा ए दिल है मुश्कील येत्या दिवाळीत, 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
- केआरके अनेक मुव्हीजचा रिव्ह्यू करत असतो. मुव्ही रिलीजआधीही तो ट्विट करत असतो.
- अनेक दिवसांपासून केआरके सोशल मीडियावर 'ऐ दिल है मुश्कील' प्रमोट करत आहे. त्याचवेळी 'शिवाय'बद्दल त्याचे कॉमेंट काही समाधानकारक नाहीत.
- नुकतेच त्याने 'शिवाय'ला हिम्मतवाला-2 म्हटले होते. दिग्दर्शक साजिद खानने अजय देवगणसोबत 'हिम्मतवाला' रिमेक केला होता. हा चित्रपट दणकून आपटला होता.
- या ट्विटनंतर 'शिवाय'चे को प्रोड्यूसर कुमार मंगत यांनी केआरकेला कॉल करुन त्याच्यासोबतचे बोलणे रेकॉर्ड करुन घेतले.
- 3 मिनिट 20 सेकंदाचे हे रेकॉर्डिंग आहे. यात कुमारनेही केआरकेला पैसे देण्याचे कबूल केले. मात्र तो म्हणाला की पैशांशिवाय तुझ्या चित्रपटाचे प्रमोशन करेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय-काय म्हणाला KRK ...
बातम्या आणखी आहेत...