आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अख्ख्या महाराष्ट्राला याड लावणारा 'सैराट' आता हिंदीत 'धडक' देणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटचा कन्नड नंतर आता हिंदीमध्ये 'धडक' नावाने रिमेक येऊ घातला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 'धडक'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. करण जोहरने फार आधी याचा हिंदी रिमेक करणार असल्याची घोषणा केली होती.
'धडक'मध्ये अर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर परश्याच्या भूमिकेत शाहिद कपूरचा धाकडा भाऊ ईशान खट्टर आहे. करण जोहरने रिलीज केलेले पोस्ट अतिशय रोमँटिक वाटत आहे. फिल्मचे टायटल व्हाइट कलरमध्ये असून 'क' अक्षराचा काही भाग लाल दिसतो.
धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओ संयुक्तरित्या ही फिल्म प्रोड्यूस करत असून शशांक खेतान 'धडक'चे दिग्दर्शन करणार आहे. फिल्म पुढच्या वर्षी 6 जुलैला रिलीज होणार आहे.
चौथे पोस्टर आहे..
याआधी 'धडक'चे तीन पोस्टर रिलीज झाले आहेत. हे फिल्मचे चौथे पोस्टर आहे. यामध्ये ईशान आणि जान्हवी रोमँटिक पोज मध्ये दिसतात.
जान्हवीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
एका पोस्टरमध्ये ईशान आणि जान्हवी रोमँटिक पोज देत आहेत. दुसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवी-ईशान यांचे डोके एकमेकाला टेकलेले आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये सूर्य मावळतान दिसतो. तर, तिसऱ्या पोस्टरमध्ये दोन्ही अॅक्टर्स एकमेकांना अलिंगन देताना दिसतात.
श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर, ईशानचा हा दुसरा चित्रपट आहे. मराठीमध्ये धुमाकूळ घातलेल्या सैराटसोबत अर्थात मराठीतील अर्ची आणि परश्यासोबत यांची तुलना होणार आहे. मराठीतून हिंदीत मारलेली ही 'धडक' किती यशस्वी होते, हे पाहाणे औत्सूक्याचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिल्मचे बाकिचे पोस्टर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.