आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बॉम्बे वेलवेट\'च्या ट्रेलर लाँचवेळी करण जोहरने उडवली चक्क अनुराग कश्यपची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर)

मुंबई- करण जोहरला बॉलिवूडमध्ये त्याच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जाते. एखाद्याची खिल्ली उडवण्याची संधी करण आपल्या हातून जाऊ देत नाही. याचाच प्रत्यय नुकताच 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी आला. यावेळी करणने बिनधास्तपणे उत्तरं दिली.
यावेळी करणने दिलेली उत्तरं ऐकून उपस्थितांना हसू आवरता आले नाही. करणने चक्क दिग्दर्शक अनुराग कश्यपची खिल्लीच उडवली.
पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, की स्वतःसाठी तुम्ही एखाद्या सिनेमाचे प्लानिंग करत आहात का? यावर उत्तर देताना करण म्हणाला, ''स्वतःलाच सिनेमात कास्ट करायला काय मी पागल झालोय? मी ही जबाबदारी स्वतः का घेऊ? अनुरागचा वेड्या कुत्र्याने चावा घेतला होता, माझा नाही. मी का स्वतःलाच सिनेमात घेऊ.''
अनुरागला आपल्या सिनेमात कास्ट करणार का? हा प्रश्न विचारला असता, तो म्हणाला, "मी माझ्या सिनेमात त्याला मुळीच घेणार नाही. उलट गुड लुकिंग अभिनेत्यांना मी कास्ट करेल."
इव्हेंटमध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मासह बॉम्बे वेलवेटची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी रणबीर आणि अनुष्काने परफॉर्मही केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटची खास छायाचित्रे...