आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor And Arjun Kapoor 'Ki And Ka' Trailer Out

'की अँड का'च्या Trailer मध्ये युनिक लव्ह-स्टोरी आणि स्टीमी केमिस्ट्रीचा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः करीना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर 'की अँड का' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात करीनाने महत्त्वकांक्षी स्त्रीची भूमिका वठवली आहे, तर कबीर (अर्जुन कपूर) ला आपल्या आईसारखे हाऊसवाइफ व्हायचे आहे. अर्थातच करीना कमावत्या पुरुषाची तर अर्जुन गृहिणीच्या रुपात आयुष्य व्यतित करताना दिसतील. कुटुंबीयांच्या विरोधाला झुगारुन ही जोडी लग्न करते आणि त्यानंतर की अँड काच्या आयुष्यात येतात एक ना अनेक ट्विस्ट...
अडीच मिनिटांचा ट्रेलर युनिक आणि गमतीशीर आहे. करीना आणि अर्जुनची केमिस्ट्रीसुद्धा लक्ष वेधून घेणारी आहे. सिनेमात दोघांनी अनेक लिप-लॉक सीन्स दिले आहेत. ट्रेलरमध्ये कॉमेडी एलिमेंट्सही बघायला मिळतात. आर. बाल्की दिग्दर्शित हा सिनेमा 1 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय. (क्लिक करुन पाहा, सिनेमाचा ट्रेलर)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, व्हिडिओतील काही स्टिल्स...