Home »News» Kareena Kapoor First Outing With Son Taimur

चिमुकल्या तैमूरची मम्मी करीनासोबतची पहिली आउटिंग, बघा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 12:29 PM IST

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान गुरुवारी रात्री तिचा तीन महिन्यांचा मुलगा तैमूर अली खानसोबत आउटिंग करताना दिसली. डिलेव्हरीनंतर करीना अनेकदा मैत्रीणी आणि नव-यासोबत सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. पण आतापर्यंत तिने तिच्या बाळाला घराबाहेर आणले नव्हते. गुरुवारी पहिल्यांदाच ही आई-मुलाची जोडी एकत्र बाहेर दिसली. करीनासोबत तिची थोरली बहीण करिश्मा आणि आणखी एक महिला होती. ही महिला कदाचित तैमूरचा सांभाळ करणारी नैनी असण्याची शक्यता आहे. करीना एका फॅमिली प्रोग्रामसाठी तैमूरसोबत बाहेर पडली होती. 20 डिसेंबर 2016 रोजी करीनाने मुलगा तैमूरला जन्म दिला.

पुढील स्लाईड्सवर बघा करीना, करिश्मा आणि तैमूरचे आउटिंगचे PHOTOS...

Next Article

Recommended